Jun 4, 2015

न्याय केव्हड्याला?

एकही नसेल एफ आय आर
तर ते मेले सेलिब्रिटी कसले
न्यायदेवतेच्या अंगावरचे आहे
ह्यांनी कधीच काढून ‘नेसले’

गडे, एमएसजी आणि शिसे
दोन मिनिटांनी पहा चाखून
आणि बेमुदत जामीन मिळवा
तुम्ही कायद्याचा मान राखून

गाडीतल्या ‘बिंग ह्युमन’ मुळे
रस्त्यावरचे ‘ह्युमन बिंग’ बळी
ह्यांनीही आहे कानात घातली
त्या एफआयआर ची सुरनळी

किरकोळ एफआयआर नको
एकदा प्रयत्न करा पुन्हा
गडे, एखादा तरी करा ना
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

दोनचार होतील केसेस, चॅनेलवर होईल चर्चा
लोकप्रियताही तुमची, अगदी बेहिशेबी वाढणार
न्यायदेवतेच्या वस्त्रांचा होईल, रीतसर लिलाव
फक्त तिच्या डोळ्याची पट्टी, कुणी नाही काढणार

- राफा 

3 comments:

Anonymous said...

mast
-Shilpa

राफा said...

Thanks Shilpa!

अपर्णा said...

hmmm