Jul 27, 2015

मिठातले आवळे

कु. कुंजलतिका तनमुडपे यांचे ‘आवळा: कृती व विचार’ हे पाककृतींपलिकडे जाऊन जेवणानुभुतीबरोबरच जीवनानुभुती देणारे खास नवगृहिणींसाठीचे पुस्तक लवकरच बाजारात येत आहे. ‘खल व बत्ते’ हे त्यांचे वायव्य महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडवून दिलेले पुस्तक वाचकांच्या ओळखीचे आहेच.
दोन्ही पुस्तके घेतल्यास २५% टक्के सवलत तसेच आवळकाठीचे एक पाकिट (लहान साईज) मोफत मिळेल.

 सर्वत्र उत्सुकता निर्माण करणा-या ह्याच पुस्तकातील एक कृती खास तुमच्यासाठी.

 मिठातले आवळे

 साहित्य: ५० ग्राम काजू (नसल्यास भाजलेले शेंगदाणे चालतील)
८ ते १० आवळे. (१० ते ८ ही चालतील. तुम्ही कुठून बघताय त्यावर आहे)
मीठ (आयोडिनयुक्त असल्यास उत्तम. शक्यतो चवीला खारट असावे व दिसायला कतरीना कैफ च्या रंगाहून थोडे कमी उजळ असावे)
एक आकर्षक बाऊल (हा नसला तरी चालेल पण

Jul 19, 2015

सांगतो ऐका!

पुण्यात भर वस्तीत डेक्कनसारख्या मध्यवर्ती भागात घडलेला हा प्रकार! मी स्वत: अनुभवलेला. कुणाही संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात टचकन पाणी आणेल असा. ह्या भीषण वेगाने होणा-या बदलाला सामोरे जायला आपण तयार आहोत का?

डेक्कन च्या चौकात एक पुस्तकांचे दुकान. नुकतेच नवीन रुपात आलेले. तिथे दुसरी भेट. मी व माझी धर्मपत्नी (पक्षी: बायको).

मागच्या म्हणजे पहिल्या भेटीत ह्या सगळ्याची सुरुवात झालीच होती. त्यावेळी मी चार पुस्तके विचारली. त्यातले एकच मिळाले (इतके काही मी वेगळे वाचत नाही गडे!). एक आऊट ऑफ प्रिन्ट होते (असणारच होते, पण आशा वेडी असते). एकाची एकच प्रत व ती डिफेक्टिव आहे म्हणून नम्रपणे सांगण्यात आले वगैरे. पण हे सगळे शोधताना, विम्बल्डनचे बॉल बॉइज व गर्ल्स जितकी तत्परता दाखवत नसतील इतका चुटपुटीतपणा