हे बघितलंत?

Jun 14, 2007

आंधळा मागतो एक डोळा, आणि देव देतो गॉगल !

क्षणभराचे काम, युगायुगांचा विसावा
'देव' हा इसम बहुतेक भारतीय असावा !

गार्‍हाणी नेऊन त्याच्या दारी
मारे आपण हाकाट्या पिटतोय
तक्रारीची खिडकी बंद करून
तो आत चकाट्या पिटतोय !

'प्रोजेक्ट विश्व' पेलायची लायकी
ह्याचाच शेवटी प्रश्न उरतो
देवाच्या 'वर' कुणीच नाही तर,
त्याचे 'अप्रेजल' कोण करतो ?

हे विश्व म्हणजे काय 'पीमटी' आहे ?
की कुणीही भाड्याने चालवावी !
देवाच्या हातात किल्ल्या देऊन ,
आपण आपली लाज का घालवावी ?

अश्या गोष्टी 'आऊटसोर्स' करून,
कधीच फळ मिळत नाही..
आता बसा बोंबलत, देवाला
आपला ऍक्सेंट कळत नाही !

काही देवमाणसांकडून तो
थोडी माणूसकी घेईल काय ?
विश्वविधाता वगैरे राहू देत
साधा माणूस तरी होईल काय ?

त्याच्यावर ठेवू विश्वास, पण
त्याचा आपल्यावर बसेल काय ?
'गॉड अट वर्क' ही पाटी
स्वर्गात तरी दिसेल काय ?

देवांचे देवांसाठीचे ते राज्य
तीच तर त्याची लोकशाही !
वरवर लोकांसाठी सर्व अवतार
पण तो मूळचा पडला शेषशाही !

- राहुल फाटक


***

11 comments:

  1. jabari

    क्षणभराचे काम, युगायुगांचा विसावा
    'देव' हा इसम बहुतेक भारतीय असावा

    हे लै आवडलं

    ReplyDelete
  2. आता बसा बोंबलत, देवाला
    आपला ऍक्सेंट कळत नाही !
    हीहीही.... :-)) कविता मस्त आहे. आजच पावूस,आज आणि लिखाण-ए-गंमत वाचले. सगळेच पोस्ट एकदम सही आहेत. खूप आवडले.
    मला वाटते, जे आकर्षक आहे ते लिहिण्यापेक्षा जे वाटतं ते लिहावं, जसं -जेव्हा वाटतं तेव्हा तसं लिहावं.
    -विद्या.

    ReplyDelete
  3. class....rahul...manapasun avadali....dev nakkich bharatiya asava....patala..

    ReplyDelete
  4. ek number posts all of em, I liked em.can we have some more.

    ReplyDelete
  5. ही हि ही रा.फ़ा एकदम झकास आणि भन्नाट

    ReplyDelete
  6. sundar...! 'kavita' aavadali... :)

    ReplyDelete
  7. Nice Poem..Apratim.
    Asech lihit raha.

    ReplyDelete
  8. Meenakshi, Yogesh, Vidya, Koham, Amol, Milind, shreyas & Rani :

    Thanx !!! :)

    ReplyDelete
  9. Bravo...... kalpakta Khupach chhaan aahe......
    Pan mi khare te saangto ( je mala watle (itaraanchi mate bhinn asu shaktaat) THIS IS BLASPHEMOUS.....
    mhanje mazya drushtikonatun...... Kalecya drushtikonatun surekh aahe....

    ReplyDelete
  10. Thanx Hrishikesh !
    BLASPHEMOUS.. hmmm.. well, like myself, you also have a right NOT to remain silent about what you feel :) so your honest (and yet courteous) comment is welcome :)

    ReplyDelete