हे बघितलंत?

Jul 12, 2007

कोडे - अजब यंत्र !

एक यंत्र आहे (मशीन ! मशीन ! )
मी त्या यंत्रावर १२० असा काऊंटर देतो (enter करतो).
(म्हणजेच मी त्या यंत्राला १२० 'युनिट्स' काहितरी काम करायला सांगतो आहे. बरोबर ?)
तर मग ते मशीन थोडा वेळ चालते. आणि बंद होते.
आत दुसऱ्या वेळी मी ९० 'युनिट्स' असा काऊंटर enter करतो..
आश्चर्याची गोष्ट अशी की ९० हे १२० पेक्षा कमी असूनही दुसऱ्या वेळी ते यंत्र जास्त काम करते.

हे कसे काय ???


उत्तर इथेच सांगा
अर्थातच ज्याना डोके चालवायचे असेल त्यानी कॉमेन्टस बघू नका :)

टीप : 'counter' आणि 'Units' ह्याना मराठी प्रतिशब्द आधी वापरून मग कंसात इंग्लिश शब्द द्यायला आवडले असते पण नेमके शब्द पटकन सुचले/सापडले नाहीत. (कोडे तुम्हाला घालायची घाई !!! :) )

4 comments:

  1. yantra gandalele ahe

    ReplyDelete
  2. नाही प्राजक्त.. यंत्र व्यवस्थित चालत आहे :)

    ReplyDelete
  3. कोड्याचे उत्तर :

    ते यंत्र म्हणजे 'मायक्रोवेव्ह' आहे !!!

    सर्वसाधारणपणे (हे असे म्हटलेले चांगले कारण माझा 'बरखा' ब्रॅंडचा मायक्रोवेव्ह असे करत नाही वगैरे कुणीतरी म्हणायचे :) ) ... तर सर्वसाधारणपणे मायक्रोवेव्ह वर तुम्ही १२० असे (ह्या क्रमाने) आकडे enter केलेत तर तो आपोआप "१:२०" (एक मिनिटं वीस सेकंद) असे करुन घेतो. मात्र ९० असे दिलेत तर मात्र ९० च (सेकंद) असे घेतो..

    अर्थातच मग,
    पहिल्यावेळी १२० दिल्यावर, १ मिनिटे २० सेकंद (१:२०) = ८० सेकंद 'ते यंत्र' (मायक्रोवेव्ह ) चालते.
    दुसऱ्या वेळी मात्र ते ९० सेकंद म्हणजेच जास्त वेळ चालते !

    हे कोडं (आणि उत्तर) तुम्हाला आवडलं असेल अशी आशा आहे ? :). तुमच्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार

    ReplyDelete
  4. तुमचा ब्लॉग खूपच छान आहे...फार आवडला ...तुमाला आजुन ल्हीवायला पाहिजे...तुमच कविता फार छान आहे..हीसाईटपहा तुम्ही http://www.quillpad.in/marathi/ हेचणा तुमाला आजुन मदाद वाहील...

    ReplyDelete