हे बघितलंत?

Dec 1, 2010

पुणेरी पाट्या आणि मॅक्डी !

 


‘पुणेरी पाट्या’ संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर ?



• आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.


• ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)


• दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.


• कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.


• टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.


• टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.


• कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)


• गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)


• पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.


• कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.


• विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.


• शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.


• दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.


• उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.


• हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)


• आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)


• कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.


• शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.




- राफा


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

30 comments:

  1. एक नंबर मित्रा !

    ReplyDelete
  2. ख-त-री रे दादा!!!!! ज-ह-ब-ह-र्या-हा!

    ReplyDelete
  3. राफा !!

    तूच एक फ्रँचाय्सी घे रे एक.. नुसते पाट्या वाचायलाही लोक गर्दी करतील !! (अर्थात पुण्याबाहेरचे लोक ;))

    ReplyDelete
  4. Prash, Meghana, हेरंब, कलंदर : मन:पूर्वक आभार !

    @Meghana: म्हणजे अगदी मन:पूर्वक आ-ह-बा-हा-र ! ;)

    @हेरंब : विशेष LOL :). 'पाट्या टाकून' सुद्धा जोरदार चालणारी एकमेव फ्रॅंचाय्सी असेल ती :)

    ReplyDelete
  5. हाहा राफा.. झक्कास.. मॅकडोनाल्ड्स वर पुणेरी आक्रमण..

    ReplyDelete
  6. Thanx मुक्त कलंदर !

    ReplyDelete
  7. Rafa IS BACK....

    punha ekda lolaloli......prachand bhari...:)

    Aparna

    ReplyDelete
  8. Aparna, prachand thanx :) !

    ReplyDelete
  9. मस्त!
    अतिशय आवडल्या सगळ्याच पाट्या.
    ह. ह. पु. वा.

    ReplyDelete
  10. Raaphaa, tumhi paatya ashyahi takata he vachun anand jahala... patyanchi authenticity jamaliye!!

    ReplyDelete
  11. Shreyas :) (ashyahi.. huh ? :) )

    ReplyDelete
  12. अमोल1:14 PM GMT+5:30

    मस्त रे भिडू...

    ReplyDelete
  13. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7102719.cms

    मटाने पण चोरले रे ....

    ReplyDelete
  14. u r rockin. puneri lok tula walit taktil.

    ReplyDelete
  15. धन्यवाद विनय !
    puneri lok tula walit taktil.
    >>>>> मी चुकून आधी 'वाळत' टाकतील वाचलं :) .. तेही संयुक्तितच आहे कारण आधी 'धुवून' मग वाळत टाकू शकतील. पण इतरांप्रमाणे अगदी 'अस्सल' लोकांनीही (अनोळखी सुद्धा) खिलाडूपणाने सर्वत्र भरभरून दाद दिली आहे रे :)

    btw, Anonymous Thanks ! (तुम्हाला आधी मी उत्तर दिले असे वाटले मला) मी लगेच म. टा. ला कळवले होते (तिथेच प्रतिक्रिया नोंदवली होती) व संपादकांना feeback लिन्क वापरून लिहीले होते पण काहीच उत्तर आले नाही.. ह्म्म्म्म ...

    ReplyDelete
  16. :))))))))))))))))))))))

    - Shachi

    ReplyDelete
  17. are Tu greatch lihitos.... mala macdonalds nahi tar BAPAT UPAHAR GRUHA madhil patya asalya sarakhe watale....

    PHATAK UPAHAR GRUHA chalu kelet tar fakta patya lihinyachi royalty milu shakel....baki sagale shetty sambhaltil.....

    ReplyDelete
  18. Thanx Mandar ! :)

    'आमचे येथे उपाहार गृहांसाठी विस्मयजनक व वाह्यात पाट्या पुरवल्या जातील' अशी एक पाटी लावतो आता :)

    ReplyDelete
  19. Hi राफा ..... तुझा sense of humor अशक्य आहे .... म्हणजे तुझ्या आयशॉटचे निबंध वाचताना सलग वाचूच शकत नाही .... हसू थांबेपर्यंत वाचणे अशक्य होऊन जाते ... I अतिचशय Love Aayshot !!! मराठी कुठे तोडली आणि कशी वाकवली किती maximum effect करता येतो हे खरच तुझ्याकडून शिकावे ...
    आणि McD ला पुणेरी तडका जबरी दिला आहेस ... एक पुणेकर असल्याने पुणेकरांना चिमटे काढलेले पाहायला (म्हणजे अनुभवायला मजा येते खूप ).
    "तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत" हा झटका सगळ्यात अव्वल आहे :)

    ReplyDelete
  20. पश्या !

    वाह.. काय दिलखुलास दाद दिली आहेस. You made my day ! (infact month ;)).

    अशी दाद मिळाली ना की संकोचून मला पूर्वीच्या मराठी 'हिरविनी'सारखे मान खाली घालून उजव्या पायाच्या आंगठ्याने जमीन उकरावेसे वगैरे वाटते :)

    आतिचशय मन:पूर्वक आभार !!!

    ReplyDelete
  21. चला ! इजा बिजा आणि आता तिजाही झाला.

    'पुणेरी पाट्या आणि मॅक्डी' हे माझे ओरिजनल लिखाण (असे लिहावे लागत आहे मुद्दाम !) म.टा. मधे 'हसा लेको' व 'खुपते तिथे गुपते' मधे 'उचलले' गेले होते..

    आत्ताच हाती आलेल्या बातम्यांनुसार ते आज रात्री 'स्टार प्रवाह' वर 'ढिंका चिका' मधेही (मोडून, तोडून व नको तश्या ऍडीशन्स करून) वापरले गेले !

    म.टा. चे ऑनलाईन 'प्रतिक्रिया' ही यंत्रणा गंडली असावी किंवा कुणी वाचत नसावे. मी दोन तीनदा फोन केला पण संबंधित व्यक्ती व्यस्त होती.

    'खुपते..' चे अवधूत गुप्ते ह्यांनी खूपच संवेदनशीलता दाखवून (खरं म्हणजे त्याची व्यक्तिश: काहीच चूक नाही) झाल्या प्रकाराबद्दल इमेलने खंत व्यक्त केली, फोन कर बोलू असेही नंबर देऊन कळवले (मी उगाचच केला नाही ही गोष्ट वेगळी)

    प्रिंट स्क्रिन ने इमेज फाईल बनवून (त्यात लेखकाचे नाव गाळून) फ़ॉरवर्ड करणा-या लोकांना ह्यात मी मुख्यत्वे दोष देईन.
    अर्थात, जन्मदाता माहीत नाही असे बाळ इमेल वाहत आले तर 'वैसेभी हमारी कोई औलाद नही' म्हणून ठेवुन घेणे योग्य नव्हे ना ! व्यावसायिक पातळीवर असे लेखन बिंधास्त वापरणे योग्य नव्हेच (लेखाखाली नाव असेल तर 'राफा' गूगल केले तर पहिल्या पानावर ब्लॉगचा संदर्भ येतो. लेखातले एखादे वाक्य अथवा चार पाच सलग शब्द जरी गूगल केले तरी मूळ लेखक शोधणे अवघड नव्हते. इच्छा मात्र हवी).
    जाना देव !

    ReplyDelete

  22. RAFA,
    I think more than print screen, ppl use copy paste.
    I came across a blog where selection of text (and thus copying it) was disabled. Even right click was disabled.
    I think u should do that to ur blog also. If select/copy isn't vailable, most of the ppl won't bother to type by hands and forwarding. If they r really interested in forwrding they will download your pdf file (which has ur name and blog address) and then will forward it.

    ReplyDelete
  23. Hi Pashya,

    Thanks a lot for your suggestion. Yes, I can certainly disable right click.. Also there are other ways to prevent/detect unauthorized copying (I am yet to explore copyscape but your suggestion has motivated me to do so :). After all, 'Knowing is not doing.. doing is doing' :) ).
    Having said that, couple of weak links still remain:
    1. Still can't prevent printscreen :) (Some nut may choose to do it in spite of knowing about the pdf)
    2. I post some of the articles on maayboli.com (exclusively). There I obviously don't have any control (of course, there also I do give the link to pdf)

    Cheers !

    ReplyDelete
  24. I did not know you wrote this!!
    मला हे एका इमेल मध्ये आलं होतं आणि ते इतकं आवडलं की I read it whenever I feel low

    Glad now I know the author of this :)
    I have a suggestion, get a copyright for this!!

    ReplyDelete
  25. Poonam, पुन्हा एकदा मंडळ आभारी आहे ! वर ह्या पोस्टचा इतिहास वाचलाच असशील ! मलाही येते अधून मधून ते इमेलने :)

    ReplyDelete
  26. राफा,
    Do you mind me sharing this link on FB? म्हणजे लोकांना (माझ्या फ्रेंड्स ना तरी) कळेल की ही तुमची निर्मिती आहे :)

    ReplyDelete