tag:blogger.com,1999:blog-31130646852024472942024-03-13T08:12:44.724+05:30राफासप्रेम नमस्कार.
आपले सहर्ष स्वागत!
'राफा' म्हणजे ‘राहुल फाटक’ चे संक्षिप्त रुप.
'काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम’ हे वचन मी विद्वानांंमधे मोडत नसल्याने मला लागू होत नाही. परंतु अनेकविध कलांमधे अत्यंत रुची व किंचीतशी गती असल्याने ह्या ब्लॉगवर मी ह्या गोष्टींमधे वेळ व्यतीत केलेला तुम्हाला आढळेल: विनोदी लेख/चुटके, ललित लेख, लघुकथा, नाटक, काव्य, चित्रकला व प्रकाशचित्रे.
ह्या ब्लॉगवरील सर्व कलाकृती पूर्णपणे 'ओरिजनल' आहेत.
- राफा<br>
ता.क. फोनऐवजी संगणकावर सर्व लिंक्स नीट दिसतील विषयानुसार.राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.comBlogger98125tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-64787128872434960962018-07-22T20:28:00.001+05:302023-01-01T22:47:42.488+05:30‘साधं’!
आपल्याकडे ‘साधं’ हा शब्द इतक्या चुकीच्या आणि ढोबळ पद्धतीने वापरला जातो. हो गोष्ट(ही) फार डोक्यात जाते! अंगावर येणारा भपकेबाजपणा, उधळपट्टी किंवा संपत्तीचे बटबटीत प्रदर्शन /
‘शोबाजी’ जशी त्रासदायक तितकाच किंबहुना काकणभर जास्त हा ‘साधं' चा
गैरवापरही...
साधं म्हणजे अस्वच्छ नाही ! उदा. हॉटेल
साधं म्हणजे हीन अभिरुचीचं, अजागळ नाही ! उदा. घर
साधं म्हणजे कल्पकतेचा आणि रुचीचा पूर्ण अभाव असलेलं राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-28071669019382356602016-08-24T08:41:00.003+05:302023-01-01T22:48:07.346+05:30कुठेसे कुणी...
कुठेसे कुणी व्याकूळ गात होते
सूर दूरचे की, माझ्याच आत होते?
झळा साहवेना, उगी राहवेना..
वणव्यात माझे प्रारब्ध न्हात होते
पुन्हा पुन्हा वहावे, वाटले नियतीला
असे वेगळे काय माझ्या आसवांत होते
तिने आर्त पाहिले, मला एकवार
हवेसे दिलासे त्या क्षणात राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-75883389555605401052015-07-27T13:10:00.001+05:302023-01-01T22:48:24.253+05:30 मिठातले आवळे
कु.
कुंजलतिका तनमुडपे यांचे ‘आवळा: कृती व विचार’ हे पाककृतींपलिकडे जाऊन
जेवणानुभुतीबरोबरच जीवनानुभुती देणारे खास नवगृहिणींसाठीचे पुस्तक लवकरच
बाजारात येत आहे. ‘खल व बत्ते’ हे त्यांचे वायव्य महाराष्ट्रात प्रचंड खळबळ
उडवून दिलेले पुस्तक वाचकांच्या ओळखीचे आहेच. दोन्ही पुस्तके घेतल्यास २५% टक्के सवलत तसेच आवळकाठीचे एक पाकिट (लहान साईज) मोफत मिळेल.
सर्वत्र उत्सुकता निर्माण करणा-या ह्याच राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-54734515743770354262015-07-19T11:57:00.001+05:302023-01-01T22:49:24.978+05:30सांगतो ऐका!
पुण्यात
भर वस्तीत डेक्कनसारख्या मध्यवर्ती भागात घडलेला हा प्रकार! मी स्वत:
अनुभवलेला. कुणाही संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात टचकन पाणी आणेल असा. ह्या
भीषण वेगाने होणा-या बदलाला सामोरे जायला आपण तयार आहोत का?
डेक्कन च्या चौकात एक पुस्तकांचे दुकान. नुकतेच नवीन रुपात आलेले. तिथे दुसरी भेट. मी व माझी धर्मपत्नी (पक्षी: बायको).
मागच्या म्हणजे पहिल्या भेटीत ह्या सगळ्याची सुरुवात झालीच होती. राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-39552740313509878612015-06-05T18:45:00.001+05:302023-01-01T22:49:54.764+05:30कॉमेडीची ट्रॅजेडी!
मराठी सिनेमाचं ना मला झेपेनासंच झालंय.
एक तर पहायला जायला उत्साह येईल असा सिनेमाच खूप दिवस येत नाही. (ह्या आधी
केवळ कर्तव्य म्हणून अनेकदा मराठी चित्रपट पाहिले आहेत. आजकाल कंटाळा
आलाय) पोस्टरमधेच काही नाविन्य, फ्रेशनेस नसतो! त्यात असा काही चित्रपट
आढळला तर तो पटकन १-२ आठवड्यातच बघून घ्यायचा. नंतर तो कुठेतरी
जिल्ह्याच्या ठिकाणीच फक्त चालू असतो. हे ब-या हीट सिनेमांचं. नाहीतर तो
आधीच झोपतो. राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-54223737283635600222015-03-19T13:22:00.001+05:302023-01-01T22:50:17.995+05:30‘ड्यानल’ आण्णांच्या पिक्चर बरोबर आमचं 'बॉंडींग' होईना !
हो, खरी गोष्ट आहे! कदाचित ऐकून
धक्काही बसेल काही जणांना. जे असेल ते असो, पण ह्या डॅनियल क्रेगच्या बॉंडपटांचे आणि
आपले सूर काही जमत नाहीत बुवा! आता ह्या वाक्यातच लेख संपायला हवा पण ‘जे असेल ते असो’
म्हणजे नेमके काय ते सांगणे भाग आहे.
पहिले प्रथम मेरा कमसीन बचपन
कैसे गुजरा यह कहानी.
मी शाळेत असताना, आमच्या एका
श्रीमंत नातेवाईकांच्या घरी VCR होता. तेव्हा VCR हा शब्दही कुणाला फारसा राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-17329128085923144872015-01-24T12:33:00.001+05:302023-01-01T22:51:36.548+05:30चित्रपट आणि चिवचिव!
तर, प्रसंग नेहमीचाच.. कारण
‘पात्रं’ तीच!
जवळचे चित्रपटगृह... ब-यापैकी चांगला चित्रपट... मी..
आणि आजूबाजूला निवांत
बोलणारी लोकं!
लक्षात घ्या, सामान्य
प्रेक्षक म्हणून (इथे काही मित्र ‘अतिसामान्य!’ असे 'धुमधडाका'तल्या अशोक सराफ सारखे
ओरडतील! सच्चे मित्र हे असेच असतात) मला चित्रपट (व पॉपकॉर्न, सामोसे इत्यादी) चा
आस्वाद घ्यायला आवडते/आवडले असते. मी काय तिथे पोलीसगिरी करायला जात नाही की राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-22844352733247733402013-12-15T12:01:00.000+05:302014-11-22T18:47:38.000+05:30चित्रपट संवाद - भाग ३ (अब रोज रोज तो आदमी जीत नही सकता ना...)
खूप खूप
वर्षांपूर्वीची गोष्ट.
‘व्हिडीओ फिल्म
मॅगझिन’ ही कल्पना तेव्हा नवीन होती. अशा पहिल्या वहिल्या मॅगझिनच्या (‘लहरें’)
एका ‘अंकात’ फिल्म इंडस्ट्रीतल्या एका सुप्रसिद्ध जोडगोळीतला सुप्रसिद्ध एक कुणी
मुलाखत देत होता...
त्या एकाच्या नेहमी
बरोबर असणारा दुसरा मात्र ह्या मुलाखतीच्या वेळेस हजर नव्हता. ह्याचे कारण आता
सर्वांनाच माहीत झाले होते. त्या दोघांची जोडी फुटली होती. एक प्रदीर्घ आणि राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-29822838480673481562013-11-16T22:51:00.001+05:302014-11-22T18:48:39.290+05:30चित्रपट संवाद - भाग २ (दहीबडा इत्यादी)
तसं म्हटल तर ह्या
लेखमालेला (हाही शिंचा फार औपचारिक शब्द) काही ठराविक आकार देता आला असता. काही
अभ्यासपूर्ण, मुद्देसूद लेखन करता आले असते. परंतु विस्कळीत गप्पा (एकतर्फी का
होईना) मारताना हे मुद्दे गौण ठरतात.
अभ्यास गप्पा मारताना दिसला पाहिजे.
‘दाखवायची’ गरज भासलई नाही पाहिजे. काय?
नाहीतर,
संवादाने
गोष्ट कशी पुढे जाते,
त्या त्या पात्राला कसा उठाव व ठसठशीतपणा येतो,
राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-9711696439419897542013-11-10T23:17:00.002+05:302020-03-29T23:43:58.449+05:30चित्रपट संवाद - भाग १
'चित्रपट संवाद', म्हणजेच देशी विदेशी चित्रपटांतील लोकप्रिय पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे अत्युत्तम पण तुलनेने कमी माहीत असलेले संवाद ह्याविषयी लिहीण्याचे डोक्यात बरेच दिवस होते.
पण ते डोक्यात आल्यापासून दोन भित्या (भिती चे अनेकवचन)
माझ्या डोक्यात आहेत
१. अनेकोत्तम
चित्रपट अनेक वेळा बघितल्यावर ‘अतिपरिचयात अवज्ञा’ होऊन अत्यंत प्रिय अश्या
चित्रपटातले अत्यंत प्रिय संवाद जर मी लेखात राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-14345812068936867962013-11-09T11:37:00.000+05:302016-07-29T07:27:53.848+05:30झटक्यात...
हौस नव्हे अम्हास, उरातल्या अग्निची पाऊल ना पडो वाकडे.. वाट ही अंधारी - राफा
राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-68057882792900904472013-08-24T11:38:00.000+05:302016-07-29T07:28:44.679+05:30झटक्यात...
सफर है कठीन, रास्ता है टेढा
डगमगाकर खुदही संभलना होगा
अगर आस है किसी रोशनी की
तो प्यारे तुझे खुदही जलना होगा
- राफा
राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-35415014191549371882013-08-17T12:37:00.000+05:302013-08-17T12:37:05.938+05:30पानवाल्याचे गि-हाईक!
राजकारण हा धंदा झाला असेल तर… आणि असेल तर म्हणजे झाला आहेच! कोई शक? तर मग त्या न्यायाने आपण ग्राहक आहोत… म्हणजे ‘गि-हाईक’ !
उज्वल भवितव्य, खेड्यांचा विकास, शिक्षण व विज्ञानाचा प्रसार, आधुनिकता
आणि प्रगती, पायाभूत सुविधा, शेती व उद्योग क्षेत्राची भरभराट, समान संधी
वगैरे भावी प्रॉडक्ट्स आपल्या गळ्यात मारण्यात येतात. (ते सुद्धा ‘पाच
वर्षांच्या’ वॉरंटीसहीत!) प्रत्यक्षात आपल्याला काय मिळते? राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-77191381661275234982013-07-21T15:10:00.000+05:302014-11-22T18:49:51.629+05:30'शोले': एक वाहून गेलेले परीक्षण!
आप्पा जोशी वसईवाले (वाचक,
दैनिक 'परखड')
दिनांक: १६ ऑगस्ट १९७५
काल गावातल्या एकमेव टॉकिजमधे 'शोले' हा अप्रतिम बोलपट पाहिला. बाहेर डकवलेल्या
पोस्टरावर ७० एमेम, सिनेमास्कोप असे काहीबाही लिहीले होते त्याचा अर्थ कळला नाही.
बायोस्कोप पाहिला होता लहानपणी, पण हा सिनेमास्कोप काय हे कळायला काहीच स्कोप
नव्हता. चित्रपटाची रिळं जास्त होती त्यामुळे पडदाही नेहमीपेक्षा मोठा लागला बहुतेक
त्यांना. चित्रपट राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-19366097606859564572013-04-17T10:10:00.002+05:302016-07-29T07:29:39.521+05:30झटक्यात
सुना है उम्मीद की रोशनी देख सारी दुनिया चलती है लेकिन यह उम्मीद साली किस फ्युएल से जलती है ? - राफा
राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-53216549474394881682013-03-27T12:18:00.000+05:302016-07-29T07:28:13.187+05:30झटक्यात
तकदीरमें थी वही पुरानी यारी
यह बात हमने तब जान ली
हम तो चले थे मुँह छुपछुपाये
मगर गम ने शक्ल पहचान ली
- राफा
राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-85427562517106197632013-03-18T20:50:00.000+05:302014-11-22T18:51:12.346+05:30गुटर्रर्रर्र‘गो’ !
पक्षी सहसा उडू शकतात.
कित्येक तासांच्या अथक सूक्ष्म
निरिक्षणानंतर मी हे संपूर्ण वैज्ञानिक असे ठाम मत बनवले आहे. आता पक्षाने
किमानपक्षी उडावे ही अपेक्षा विश्वसुंदरीने किमान नाकी डोळी नीटस असावे इतकी माफक
नाही का ?
पक्ष्यांबद्दल मला साधारण
तेव्हढीच माहिती आहे जेव्हढी त्यांना माझ्याबद्दल. उदाहरणार्थ, मी ‘सहसा उडत नाही’
हे त्यांना माहित आहे.
‘पक्षी उडू शकतात का?’ असा संशय
येण्याइतके राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com17tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-60779983106293833172013-03-15T22:47:00.000+05:302016-07-29T07:29:58.348+05:30झटक्यात
गाठलेच त्यांनी मला, पण एव्हढा पोच होता
वार पहिला कुणाचा... हाच संकोच होता
कोरले शब्द खोटे, त्यांनी थडग्यावरीही
कोरावया पण टोकदार खंजीर तोच होता
- राफा
राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-17158035577289265072013-03-08T09:09:00.003+05:302014-11-22T18:51:34.469+05:30लोकल इश्यू !
आज एकदम दोन गोष्टी आठवल्या!
दोन्ही आठवणी एकाच विषयाशी
निगडीत: मुंबईमधील 'लोकल' सेवा !
आठवण क्र. एक :
काही वर्षांपूर्वी जनरल गप्पा मारत असताना एका मित्राशी माझी
अचानक तात्विक चर्चा चालू झाली (म्हणजे वाद/उहापोह…जाज्वल्य मते व मतांतरे… कॉफी… पुन्हा
उहापोह वगैरे वगैरे).
विषय होता : मुंबईमधला लोकल प्रवास, त्याचा दर्जा, सोयी व
सुविधा वगैरे.
त्याचे म्हणणे असे की लोकसंख्याच इतकी राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-29600914762161093642013-03-02T12:13:00.002+05:302013-03-02T12:13:59.518+05:30झटक्यात दोन इनोद !
तर, येस, आय्याम गिल्टी ! सुमारे नऊ महिन्यात काहीही लिहीले नाहीये ब्लॉगवर.. त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट (माझ्यासाठी) म्हणजे WIP (काम चालू म्हणून रस्ता बंद) असं अर्धवट लिखाण झालं आहे (अर्धवट हे लिखाणाचे विशेषण आहे, लेखकाचे नव्हे ) त्यामुळे ते पूर्णत्वास जाईलच कधीतरी...
तर, तोपर्यंत धुगधुगी रहावी म्हणून हे पोस्ट (फेसबुक वरच्या मित्रमैत्रिणींकडे 'अटकपूर्व जामीन' मागत आहे त्यांनी हे राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-76098235296984080162012-04-14T20:07:00.000+05:302014-11-22T18:51:59.480+05:30पकडा-पकडी !
मी: नमस्कार. आपण बनसोडे बोलताय का ?
बनसोडे: बोला.
मी: मी संरजामे. आपण सर्पमित्र, प्राणीमित्र वगैरे असल्याचं ऐकलं. आमच्या बाल्कनीत..
बनसोडे: ते सर्पमित्र वेगळे ! ते छंद वगैरे जोपासतात. लोकसेवा वगैरे. आपला व्यवसाय आहे, आधीच सांगतो !
मी: सांगा ना.
बनसोडे: च्च. तसं नै. लोक नंतर पैशे द्यायला कटकट करतात. म्हणून आधीच सांगतो. लोकांनी पैसे नाय दिले ना तर मग पकडलेला साप तसाच सोडून येतो आपण. राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com28tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-48663802184599985262012-02-20T10:08:00.000+05:302016-07-29T07:30:26.028+05:30झटक्यात...
बडी काली हो रात और फैला हो खौफ
और सिर्फ अंधेराही हो दिलों में छाए
पलट सकता है बाज़ी, उम्मीदका एक दिया
किसीके दिलमें रोशनीका खयाल तो आए
- राफा
राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-57165461562434295592012-02-13T19:44:00.000+05:302018-08-12T22:20:53.544+05:30जगावे कसे ते सांग..
जगावे कसे ते सांग, येथे कण्याने ताठ
शेवटास आहे जिथे, आकाशही वाकलेले
फुका आवई नको, अंतहीन ग्रहणाची
बिंब तेजाचे होते.. जरासे झाकलेले !
एकला डाग करतो, कुणा अस्वस्थ रात्री
घोरती निवांत कोणी, नखशिखांत माखलेले
नको बोध तुमचा, जरा चवीने जगाया
अवेळी आहेत अश्रू, आम्हीही चाखलेले
- राफा
राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-76392516350898892572012-01-28T10:19:00.001+05:302016-07-29T07:30:40.539+05:30झटक्यात..
लगता है इस कलयुग में
वह भी अपने वादे से मुकर जायेगा
आजकल के कंस, रावण देख
भगवानभी अवतार लेने से डर जायेगा
- राफा
(हिंदीतच सुचले आणि 'झटक्यात' पोस्टले :))
राफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3113064685202447294.post-74224672679757794762012-01-19T18:46:00.000+05:302012-01-19T18:46:51.744+05:30आजची बातमी आणि..आजच्या बातमीनंतरच्या 'झटक्यात' :
बरसों बीते, देख रहे हो भ्रष्टाचार
बेटा, इतना तो समझो कमसे कम
नौ महीनें और पाच लाख दिये तो
हो जाय करोडों का घोटाला हजम
बाहर के दुश्मन करे हमसे धोखा तो
पुरी तैय्यारी है, हम उन्हे झेल लेंगे
अंदर के दुश्मन से रहो चौकन्ना यारों
ये साले कसाब को भी ‘बेल’ देंगे
- राफाराफाhttp://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.com3