Mar 2, 2013

झटक्यात दोन इनोद !

तर, येस, आय्याम गिल्टी ! सुमारे नऊ महिन्यात काहीही लिहीले नाहीये ब्लॉगवर.. त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट (माझ्यासाठी) म्हणजे WIP (काम चालू म्हणून रस्ता बंद) असं अर्धवट लिखाण झालं आहे (अर्धवट हे लिखाणाचे विशेषण आहे, लेखकाचे नव्हे ) त्यामुळे ते पूर्णत्वास जाईलच कधीतरी...

तर, तोपर्यंत धुगधुगी रहावी म्हणून हे पोस्ट (फेसबुक वरच्या मित्रमैत्रिणींकडे 'अटकपूर्व जामीन' मागत आहे  त्यांनी हे आधी वाचले असेल तिथे तर ) :

तर,

प्रत्येकी सुमारे साडेतीन सेकंदात सुचलेले हे दोन इनोद (वाचून रडू फुटल्यास मला जबाबदार धरू नये :) ):

१)
तो जमाना ७० च्या दशकाच्या अगदी सुरुवातीचा ! जेव्हा डासांचा सुपरस्टार हिरो जवळजवळ प्रत्येक डासीणीच्या मनावर अधिराज्य करत होता. (सोयीसाठी आपण त्याला डासेश फन्नाम्हणू). 

अशाच एका रम्य रात्री, गाढ झोपलेल्या बंडोपंताच्या हातावर बसलेली एक नवतरुणी डासीण डासेशच्या विचाराने व्याकूळ झाली होती. न रहावून तिने निर्णय घेतला आणि बंडोपंताना चावून नुकत्याच बाहेर काढलेल्या रक्ताने ती डासेशला निर्वाणीचे प्रेमपत्र लिहू लागली. 

एव्हढ्यात, उडत उडत तिची भुकेली डासीण आई तिच्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाली कित्ती वेळा सांगितलयं तुला... अशी अन्नाची नासाडी करु नये !

२)
प्रथमच लहानश्या खेडेगावात आलेला चिमुकला पिंटू, एक गोठा पाहून आईला विचारतो "हे काय आहे?". 

त्यावर त्याची आई ('कित्ती कित्ती चौकस माझं शोंदड ते' छाप भाव चेह-यावर आणत) उत्तर देते "मघाशी नै का बैल नावाचा ऍनिमल पाहिलास... तो बैल दिवसा शेतात काम केल्यावर रात्री इथे गाई गाई करतो !"


(आमेन ! :) )



- राफा


5 comments:

भानस said...

वेलकम बॅक! :)

इनोद... :D :D

श्रिया (मोनिका रेगे) said...

राफा...is back! :)

अपर्णा said...


चला म्हणजे तुला नऊ महिण्यांणी का होईना पण ब्लॉगचा पत्ता सापडला तर....
विनोद आधीच वाचलेले पण त्याआधीचा कंसातला विनोद आवडला..अर्धवट (लेखक नव्हे), लिखाण लवकर पूर्ण करणेत यावे... ;)

Yogini said...

he hee nae thodake!!!
lihite rahaa..

Himanshu said...

HA HA HA HA HA HA! :-P

Welcome back.