एक तर पहायला जायला उत्साह येईल असा सिनेमाच खूप दिवस येत नाही. (ह्या आधी केवळ कर्तव्य म्हणून अनेकदा मराठी चित्रपट पाहिले आहेत. आजकाल कंटाळा आलाय) पोस्टरमधेच काही नाविन्य, फ्रेशनेस नसतो! त्यात असा काही चित्रपट आढळला तर तो पटकन १-२ आठवड्यातच बघून घ्यायचा. नंतर तो कुठेतरी जिल्ह्याच्या ठिकाणीच फक्त चालू असतो. हे ब-या हीट सिनेमांचं. नाहीतर तो आधीच झोपतो. कारण एकूण सिनेमाच अनुदानामुळे का कशामुळे माहीत नाही पण
सप्रेम नमस्कार.
आपले सहर्ष स्वागत!
'राफा' म्हणजे ‘राहुल फाटक’ चे संक्षिप्त रुप.
अनेकविध कलांमधे अत्यंत रुची व किंचीतशी गती असल्याने ह्या ब्लॉगवर मी ह्या गोष्टींमधे वेळ व्यतीत केलेला तुम्हाला आढळेल: विनोदी लेख/चुटके, ललित लेख, लघुकथा, नाटक, काव्य, चित्रकला व प्रकाशचित्रे.
ह्या ब्लॉगवरील सर्व कलाकृती पूर्णपणे 'ओरिजनल' आहेत.
- राफा
ता.क. फोनऐवजी संगणकावर बघा किंवा तळाशी View Web Version क्लिक करा म्हणजे सर्वात वर आणि उजवीकडे सर्व लिंक्स नीट दिसतील विषयानुसार.
विषय
Jun 5, 2015
कॉमेडीची ट्रॅजेडी!
एक तर पहायला जायला उत्साह येईल असा सिनेमाच खूप दिवस येत नाही. (ह्या आधी केवळ कर्तव्य म्हणून अनेकदा मराठी चित्रपट पाहिले आहेत. आजकाल कंटाळा आलाय) पोस्टरमधेच काही नाविन्य, फ्रेशनेस नसतो! त्यात असा काही चित्रपट आढळला तर तो पटकन १-२ आठवड्यातच बघून घ्यायचा. नंतर तो कुठेतरी जिल्ह्याच्या ठिकाणीच फक्त चालू असतो. हे ब-या हीट सिनेमांचं. नाहीतर तो आधीच झोपतो. कारण एकूण सिनेमाच अनुदानामुळे का कशामुळे माहीत नाही पण
Mar 19, 2015
Dec 15, 2013
चित्रपट संवाद - भाग ३ (अब रोज रोज तो आदमी जीत नही सकता ना...)
Nov 16, 2013
चित्रपट संवाद - भाग २ (दहीबडा इत्यादी)
नोकरी आणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक !
नोकरीआणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक ! - २
Nov 10, 2013
चित्रपट संवाद - भाग १
Jul 21, 2013
'शोले': एक वाहून गेलेले परीक्षण!
Dec 16, 2011
शॉर्ट फिल्म : टॉईज कम अलाईव्ह !
यूट्यूब वर पहा : http://youtu.be/x527bYOPfP0
स्थळ: पिट्सबर्ग, अमेरिका
काळ: साल २००३ मधील कडकडीत हिवाळा.
झालं ते असं :
मी ‘पिट्सबर्ग फिल्म मेकर्स’ मधे फिल्म मेकींग कोर्स करत होतो. एक शॉर्ट फिल्म प्रॉजेक्ट करायला फारच थोडा वेळ राहीला होता. शूट करायला एक विकएंड आणि एडीट करायला पुढचा एक विकएंड. (ते एडिटींगही जुन्या पद्धतीने करायचे होते. म्हणजे फिल्मचे तुकडे कापून, चिकटवून दृश्यांची जुळणी व फेरजुळणी करणे वगैरे. ते क्लिष्ट, किचकट व कष्टाचे काम करायला इतकी धमाल (!) आली म्हणून सांगू :) .
बाहेर अमानुष बर्फ. नटमंडळी कुणी नाहीत. अशा वेळी ह्या शॉर्ट फिल्म साठी ही कल्पना सुचली. शूट झाले. डेव्हलप केले. एडीट केले (धमाल !)
गेली ८ वर्षे तो ‘रफ कट’ पडूनच होता.. डिजिटल स्वरुपात धर्मांतर झाल्यावर फिल्म चे स्वरुप अजूनच ‘दाणेदार’ झाले होते.. ‘अशी जुनाट फिल्म पहायला कोणाला आवडेल’ ही भिती होती त्यामुळे तो रफ कट त्या प्रश्नासकट तसाच पडून होता आणि दिवसेंदिवस त्या प्रश्नाचे उत्तर ‘कुणालाच नाही’ असेच बळकट होत होते. (आता तर मोबाईल वर पण HD व्हिडीओ घेता येतात म्हणजे प्रश्नच संपला !)
शेवटी धीर करून ह्या आठवड्यात तो रफ कट मी पुन्हा एडीट केला (ह्या वेळेस डिजिटल एडीटींग!). मूळचे ‘स्टॉप मोशन ऍनिमेशन’ तसेच ठेवले व इतर कुठलेही स्पेशल इफेक्ट्स टाकले नाहीत. त्या ‘जुनाट’ स्वरुपाची वेगळीच गंमत वाटली, नॉस्टाल्जिक व्हायला झाले आणि एकंदर खूपच आनंददायक अनुभव होता तो.
तसाच आनंद तुम्हाला फिल्म बघताना वाटेल अशी आशा आहे
- राफा
ता. क. कृपया ध्वनीसकट पहा.
Aug 17, 2007
रेड ऑन एन्टीबी !
१९७७ चा असला आणि टि.व्ही. साठी बनवलेला असला तरी आजही त्याची निर्मीतीमूल्ये चांगली वाटतात... उत्तम दिग्दर्शक व अभिनेते आहेत... बराचसा चित्रपट डॉक्युमेंटरीच्या शैलीत आहे आणि म्हणून(ही) प्रभावी वाटतो.
चित्रपट ज्यावर बेतला आहे तो घटनाक्रम साधारण असा होता :
जून २७, १९७६ रोजी एअर फ्रान्सचे विमान अथेन्सहून पॅरीसला जाण्यासाठी सुटले. ते विमान आधी तेल अवीव हून निघाले होते.. साधारण अडीचशे प्रवासी असलेल्या ह्या विमानाचे अपहरण पॅलेस्टीनी (PFLP) व जर्मन अतिरेक्यांनी केले. मधे लिबीयात इंधनासाठी थांबून ते विमान थेट युगांडात एन्टीबी विमानतळवर उतरवण्यात आले.
त्या ४ अपहरणकर्त्यांना अजून अतिरेकी नव्याने येऊन मिळाले. विमानतळाच्या एका इमारतीत सर्व प्रवाशाना कोंबण्यात आले. इमारतीभोवती स्फोटके लावली गेली. अतिरेक्यांची मुख्य मागणी जाहीर करण्यात आली की वेगवेगळ्या देशात (मुख्यत: इस्त्रायल मधे) कैदेत असलेल्या चाळीस पॅलेस्टीनींची सुटका करावी नाहीतर ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना ठार मारले जाईल.ह्या सर्व प्रकाराला युगांडाचा सर्वेसर्वा (राष्ट्राध्यक्ष/लष्करशहा) इदी आमीन ह्याचा पाठींबा होता. युगांडाच्या लष्करातील सैनिकही ह्या इमारतीभोवती पहाऱ्यास होते.
लवकरच इस्त्रायलचे नागरिक व ज्यू (सुमारे १००) सोडून बाकी प्रवाशांची मुक्तता करण्यात आली. अतिरेक्यांनी त्यांची मागणी पूर्ण करण्याची मुदत वाढवून १ जुलै ऐवजी ४ जुलै केली.
अतिरेक्यांशी चर्चाही न करणाऱ्याचे धोरण असलेल्या इस्त्रायल पुढे हा मोठाच पेच होता. त्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाची गुंतागुंत तर होतीच पण अंतर्गत परस्परविरोधी मतांचा दबाव आणि चुकीच्या पद्धतीने परिस्थिती हाताळल्यास लोकक्षोभाचीही भिती होती.
पण अखेर...
इस्त्रायलने जे केले त्याला लष्करी कारवायांच्या इतिहासात क्वचितच तोड सापडेल !!!
जुलै ३ ला, तुटपुंज्या वेळात आणि अतिशय गुप्तपणे आखलेल्या लष्करी कारवाईचा आरंभ झाला. अडीच हजार मैल प्रवास करुन इस्त्रायलची २०० सर्वोत्तम सैनिक/कमांडोज ची तुकडी ३ विमानानी युगांडात उतरली... थेट एन्टीबी विमानतळावर !
अतिरेक्याना मारुन प्रवाशांची सुटका करणे हे या मोहिमेचे मुख्य लक्ष्य होते. अर्थातच मधे पडलेच तर युगांडाच्या सैनिकाना गारद करणे ('neutralize' हा शब्द मला आवडतो) हा भागही आधीच ठरवला गेला होताच
वेगवेगळ्या कारणांसाठी इस्त्रायल असे काही करेल अशी सुतराम शक्यता नव्हती. अचानक झालेल्या हल्ल्याने अतिरेकी व युगांडाचे सैनिक गडबडले.. त्या धुमश्चक्रीत सर्वच्या सर्व ७ अतिरेकी मारले गेले. २० युगांडन सैनिक गारद झाले. दुर्दैवाने एक इस्त्रायली कमांडो कामी आला व १०० प्रवाशांपैकी तीन मारले गेले. ही लढाई सुमारे अर्धा तास चालली होती. पाठलाग करु नये म्हणून विमानतळावरच्या युगांडाच्या ११ मिग विमानांनाही (म्हणजे एक चतुर्थांश युगांडन हवाई दल !) नष्ट करण्यात आले !
हा सर्व घटनाक्रम इतका सनसनाटी, थरारक आणि आश्चर्यकारकही आहे की बघून थक्क व्हायला होते.. मुळात सत्य घटनाच एव्हढ्या नाट्यपूर्ण आहेत की काल्पनिक प्रसंगांची जोड देण्याची गरजही नाही. चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'Raid on Entebbe' हे हॉलिवूड version आहे असे कुठे जाणवत नाही. एकतर सुरेख दिग्दर्शन, अभिनय आणि दुसरे म्हणजे सत्य घटनांशी बरेचसे प्रामाणिक राहणे यामुळेच चित्रपट जमला आहे. (ह्या घटनेवरच आधारित दुसरा चित्रपट म्हणजे - इस्त्रायलचे जे version आहे - 'व्हिक्टरी ऍट एन्टिबी' तोही मी पाहिला होता. त्यात बर्ट लॅंकेस्टर, ऍंथनी हॉपकिन्स वगैरे अभिनेते असूनही त्यापेक्षाही 'Raid on..' च अतिशय सरस झाला आहे !)
एक घटनाक्रम म्हणून एकाच वेळी जो थरार आणि सुरसता (युद्धस्य कथा.. ) आहे त्यात मला रोचक/महत्वाच्या वाटलेल्या गोष्टींपैकी काही :
- अथेन्स विमानतळावर सुरक्षा रक्षकांचा संप अतिरेक्यांच्या पथ्यावर पडणे
- एका इस्त्रायली कंत्राटदाराने एन्टीबी विमानतळ बांधल्याने त्याच्या अंतर्गत रचनेची माहीती ('मिलिटरी इन्टेलिजेन्स' साठी) उपयोगी पडणे. तसेच सुटका झालेल्या प्रवाशांच्या मदतीने अतिरेक्यांची रेखाचित्र काढून कमांडोजना ती तोंडपाठ करवणे.
- एकीकडे नमते घेतल्याचे दाखवून.. अतिरेक्यांशी चर्चेस तयार होऊन, त्यांची मागणी ऐकून घेऊन, मुदत वाढवून घेऊन.. दुसरीकडे, प्रवाशांच्या सुटकेसाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणे (अशक्यप्राय वाटणार्या लष्करी कारवाईचीही तयारी करणे)
- चित्रपटात चार्ल्स ब्रॉन्सन म्हणतो तसे यशस्वी मोहिमेचे मर्म : ' स्पीड, सायलेन्स ऍंड कम्प्लीट सरप्राईज !'
- इदी आमीन वापरायचा तशीच काळी मर्सिडीज विमानातून आणून ती कारवाईत वापरणे - ह्या युक्तीला दाद द्यावी तितकी कमीच ! (इदी आमीन कधीतरी येऊन परिस्थिती बघून जायचा / प्रवाशांसमोर नाटकी भाषणबाजी करून नक्राश्रू ढाळायचा .. त्यामुळे इमारतीच्या दरवाजाबाहेर असलेल्या अतिरेक्याना वाटते की त्या विक्षिप्त इदी आमीनचीच शाही स्वारी आली आहे एव्हढ्या रात्री.. पण आत काही इस्त्रायली सैनिक असतात. तशाच मर्सिडिजमुळे अगदी जवळ जाईपर्यंत अतिरेक्याना संशयच येत नाही )
- "परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असणारे अतिरेकी (जरा संशय आला तरी नि:शस्त्र ओलीस लोकांवर सेकंदात गोळ्यांचा वर्षाव करण्याच्या परिस्थितीत असलेले), स्फोटकानी वेढलेली इमारत, युगांडन सैनिकांचे सहकार्य" विरुद्ध "अडीच हजार मैल प्रवास करुन आलेले, अनोळखी देशात नि तुलनेने अपरिचित इमारतीत शिरून एकाच वेळी अतिरेक्यांचे शिरकाण आणि प्रवाशांची सुरक्षा व सुटका अशी अतिअवघड जबाबदारी असलेले इस्त्रायली सैनिक" !
- एक राष्ट्र म्हणून ठाम उभे राहणारे इस्त्रायल. अतिशय कणखर , अतिरेक्यांपुढे न झुकणारे आणि आपल्या नागरिकांच्या सुटकेची विलक्षण काळजी असणारे नेतृत्व ! ज्याला act of war म्हणता येईल (दुसर्या देशाच्या हवाई हद्दीत विमाने घुसवून, उतरवून, सैनिकी कारवाई करणे) असे धाडस योग्य कारणासाठी, कुणाची परवानगी घेत न बसता व नंतरच्या आंतरराष्ट्रीय विरोध व निंदेला न घाबरता आत्मविश्वासाने करणे.. खरोखरच ह्या छोट्या राष्ट्रापासून किती तरी शिकण्यासारखे आहे ! (आपल्या व त्यांच्या असंख्य गोष्टीत (parameters) फरक असला तरी, 'पोलादी नेतृत्व', 'आपल्या देशातील नागरिकांची काळजी व संघभावना' व 'एक राष्ट्र म्हणून स्पष्ट व ठाम भूमिका' ह्या गोष्टींचे महत्व व आवश्यकता वादातीत नाही का ?)
- विमानाचा फ्रेंच पायलट व कर्मचारी ह्यानी सुटका केली असता जायला चक्क नकार दिला ! 'अजूनही कैदेत असणारे १०० प्रवासी हीसुद्धा आमचीच जबाबदारी आहे' अशी भूमिका पायलटने घेतली आणि त्याच्या सहकार्यांनी त्याला पाठींबा दिला व ते तिथेच राहिले.. ह्या शौर्याबद्दल व आपल्या व्यवसायाशी असलेल्या निष्ठेबद्दलही त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच, पण नंतर सुटका झाल्यावर एअर फ्रान्सने नेमक्या ह्याच कारणासाठी पायलटला काही दिवस चक्क सस्पेंड केले होते !
असा हा नाट्यपूर्ण 'रेड ऑन एन्टीबी' जरुर मिळवून पहा !
घटनाक्रमाची अधिक माहिती :
http://en.wikipedia.org/wiki/Operation_Entebbe
चित्रपटाविषयी अधिक माहिती :
Jul 7, 2007
चल धन्नो !
‘शोले’ किती वेळा पहिला ? गणती नाही ! किती वेगवेगळ्या प्रकारे त्याचा विचार केला ? मोजदाद नाही ! एक वेळ अशी होती (कदाचित आजही) की संवादाशिवायही असलेला तुकडा काही सेकंद ऐकवला (ध्वनी / पार्श्वसंगीत) तरी मी सीन कुठला ते सांगू शकत असे..
तो शेवटी एक चित्रपट आहे, एक व्यावसायिक चित्रपट आहे .. आत्यंतिक यशस्वी, एक वेगळेच वलय असलेला, पुन्हा न होऊ शकणारा पण तरीही शेवटी एक चित्रपट आहे !
आफ्टर ऑल इट्स अ मूव्ही ! तरीही …
तरीही... एका मोठ्या क्लायमॅक्स ची सुरुवात होताना ..
म्हणजेच बसंती गावाबाहेर वीरुची तळ्याच्या काठी वाट पहाताना गब्बरच्या टोळीतले डाकू तिला गाठतात तेव्हा ..
जेव्ह्या त्यांच्या अभद्र प्रतिमा तळ्याच्या पाण्यात उमटलेल्या दिसून वीरुच्या स्वप्नात रमलेल्या तिला खाडकन जाग येते तेव्हा …
आणि लगबगीने ती तिच्या टांग्याच्या दिशेने पळते तेव्हा ..
आपल्या लाडक्या धन्नो घोडीवर चाबूक चालवून ती तिला साकडं घालते तेव्हा …
टु बी प्रिसाईज,
ती जीवाच्या आकांताने ‘चल धन्नो, आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है !’ म्हणते तेव्हा …
तेव्हा… प्रत्येक वेळी ... माझ्या डोळ्यात सटकन पाणी येतं ! हाताच्या मुठी वळल्या जातात .. ‘रौंटे खडे हो गये’ असा काहीतरी अनुभव येतो .. दर वेळी तशाच अंगाला झिणझीण्या येतात आणि मी आर. डी. च्या पार्श्वसंगीतात थडथडणारा पं. सामताप्रसाद यांचा तबला ऐकू लागतो .. श्वास रोखून तो पाठलाग पाहू लागतो !
नाऊ प्लीज ! डोन्ट गेट मी रॉंग ! लाऊड, बटबटीत अतिप्रंसग किंवा हिंसा हे खोटे आहेत, चित्रपटाचा भाग आहेत हे उमजण्याच्या वयानंतर प्रगती करत करत आता मी शांतपणे चॅनल चेंज करुन त्या प्रसंगापासून ‘डिटॅच’ होऊ शकतो ! (आणि ह्याउलट म्हणजे मी(ही) पहायच ते आणि पहायच तेव्हा पहातोच ! हिडीसपणा आणि कल्पना दारिद्र्य नसलेले उन्मादक गाणे किंवा प्रसंग हिंदी चित्रपटाच्या चौकटीचा भाग म्हणून काहिही वावगे न वाटता इतर कुणाहीप्रमाणे एन्जॉय करतोच ! )
तर मग हाही हिरॉईनच्या पाठी गुंड लागणे (आणि बहुतेक वेळा योग्य वेळी हिरो येणे) हा बराचसा 'घिसापिटा'च प्रसंग ना ?
पण मग ह्याच प्रसंगात झिणझिण्या येण्यासारखं असं काय आहे कळत नाही ! काहीतरी आत होतं हे खरं ! आणि प्रत्येक वेळी का ?
हेमा मालिनी बसंतीच वाटते म्हणून ?
का अधाशी, रानटी डाकू तिच्या मागे लागल्याची 'नॅचरल रिऍक्शन' म्हणून ?
का मेलोड्रॅमॅटीक, स्टाईलाईज्ड आणि तरीही अतिशय जमून गेलेल्या प्रसंगाला नकळत दिलेली दाद म्हणून ?
हे सगळ आहेच ! नक्कीच !
पण कदाचित अजून काहितरी असतं / आहे ह्या प्रसंगात, जे दर वेळेला भिडतं !
चल धन्नो !!! येस ! तो आक्रोश ! तोच बरचं काही सांगून जातो.
ती हाकच सांगते की बास ! दॅट्स इट ! धिस इज ‘द’ मोमेन्ट !
धन्नो ! ‘भाऽऽऽग’ !
अगं माझ्या पाठी हे लांडगे लागलेत ! तुला आजवर आपल्या हाताने मोठं केलं, ओला चारा खाऊ घातला, मायेने कुरवाळलं ! आज आत्ता त्या सगळ्याच मोल मला हव आहे.. माफ कर मला अशी वसुली केल्याबद्दल ! पण काय करु ? आज पायाखालची जमीनच सरकली आहे.. आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है !
कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतो ! आर या पार ! हे हे... ते ते... अजूनही काही काही.. सगळं सगळं केलं .. कष्ट उपसले, डोक चालवलं, काळजी घेतली, नियम पाळले … त्याचं फळ आत्ता, ह्या क्षणी हवय ! नाहीतर सगळ व्यर्थ !
बसंती फाटलेल्या आवाजात चित्कारते: 'भाऽऽग' !!!
विचार करु नकोस धन्नो, विश्वास ठेव माझ्यावर आज समरप्रसंग आहे.. पळत सुट बेफाम ! रस्ता जाईल तिथे ! वाट फुटेल तिथे ! दगड धोंडे, काटेकुटे ह्याची पर्वा न करता, उर फुटेपर्यंत फक्त पळत सुट ! तुझ्या मालकिणीची अब्रू धोक्यात आहे ! ह्या पेक्षा मोठ कारण तुला काय हवयं ? आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है !
धन्नो मन लावून धावू लागते… तिच्या नालेला ठेचाळत मागे जाणाऱ्या एकेका दगडाकरता एकेक मात्रा मोजत तबला थिरकु लागतो !
ते आहेतच मागे ! आता ही कुठे जाते ? हीला गाठायचीच आणि सरदाराला खूश करुन टाकायचे ह्या मस्तीत, ह्या जिद्दीने घोडेस्वार मागे लागलेलेच असतात.. टांग्याला हात घालायचा प्रयत्न करत .. एक तर पोचतोही टांग्यात .. पण बसंती प्रसंगावधान राखून टांग्याच्या एका बाजूचा दिवा त्याच्या टाळक्यात हाणते ! तो घरंगळतो बाजूला …
पाठलाग चालूच आहे !
अजून संकट सरलेलं नाही .. श्वास आहे तोपर्यंत धावायच आहे धन्नो ! माझ्याबरोबर टांग्याचं ओझ वहात, मागे घोड्यांवर बसलेल्या जनावरानां मागे टाकायच आहे… माझा वीरु येईलच तोपर्यंत ! (तो निघालाही आहेच ! धनगर पोराने दाखवल आहे त्या दिशेला .. ज्या दिशेला टांगा आणि त्या मागून घोडेस्वार गेले आहेत ! झपाट्याने झणाणणारं गिटार वाजतय … मनाला थोडी आश्वासक वाटणारं.. उभारी देणारं .. पण, तरीही शेवटी धोक्याचं संगीत मिसळतय त्यात … )
इकडे धन्नो धावत्ये .. सर्व शक्ती एकवटून धावत्ये !
आणि … एका खडकाला आपटून टांगा कलंडतो .. टांग्यापासून सुटून धन्नो पुढे जाते !
पण तिचं भान सुटलय !!! डोक्यात एकच लक्ष्य त्या मुक्या जनावराच्या … धावायचंय ! मालकिणीला सोडवायचयं ! आणि त्यासाठी … धावायचयं !
ह्या एकाच वेडाने संमोहीत झाल्यासारखी बिचारी धन्नो धावत पुढे निघून जाते ! तिला हे जाणवतंच नाही की आता तिचं धावण व्यर्थ आहे.. तिला दूर जाताना पाहून तस्सच काळजात चर्र होतं दर वेळेसारखं...
आणि जणू काही हा नव्यानेच धक्का बसल्यासारखा मी उदास होतो ! ‘भाऽऽग’ च्या वेळी आलेल्या झिणझिण्या अजून गेलेल्या नसतात !
…
...
आणि मग काही वेळाने मी वास्तवात परत येतो ..
ओह येस.. अफकोर्स, आफ्टर ऑल इट्स जस्ट अ मूव्ही !!!
Jun 27, 2007
यादों की बारात !
२७ जून !
आज 'पंचम'चा जन्मदिवस !
आज दिवसभर त्याच धुंदीत राहणार ! रोज एक 'ट्रॅक' सतत चालू असतोच.. पण आज विशेष !!!
असंख्य गाण्यांच्या अगणित आठवणी... अनुभवलेले असंख्य सुंदर क्षण ! अनेक कार्यक्रम, मुलाखती, खास 'किस्से'. महाजालात तर अतिशय जबरदस्त नि सुंदर माहिती उपलब्ध आहे..
काय करु ? randomly आवडती गाणी झरझर लिहू ? मग एखादे अत्यंत आवडते निसटले तर ? हरकत नाही... हा काही 'ज्ञान' दाखवायचा दिवस नाही...
अप्रतिम अनुभव देणारी,
मनाला उभारी देणारी,
झिंग चढवणारी,
नाचायला लावणारी,
वेगळ्याच जगात घेऊन जाणारी,
ठेका धरायला लावणारी,
आसमंतात रोमान्स पसरवणारी,
विविधरंगी
विविधढंगी
गाणी देणाऱ्या पंचमची आठवण अजूनच तीव्र होण्याचा हा दिवस ! कृतज्ञ होण्याचा दिवस !
पार्श्वसंगीताने अनेक चित्रपटांतील प्रसंगाना वेगळी उंची देणारा आर डी हा एक वेगळाच आवडीचा विषय !
काय लिहू ? किती लिहू ?
ह्म्म्म्म... आवडती गाणी लिहायला सुरुवात केली आणि...
फिझूल आहे प्रयत्न !!! :)..
तरीही ह्या आठवड्यात/ गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा (काही काही हजराव्यांदा) ऐकलेली, अजूनही काहितरी नवे सापडणारी, पुन्हा नव्याने आवडलेली नि भिडलेली random गाणी :
यादोंकी बारात - टायटल सॉंग - both male and female versions
यहा नही कहूंगी - मि. रोमिओ
राह पे रहेते है - किशोर - नमकीन
क्या यही प्यार है - रॉकी
मेहबूबा - शोले
संग मेरे निकले थे साजन - फिर वोही रात
जिया ना लागे मोरा - बुढ्ढा मिल गया
इश्क मेरा बंदगी है - ये वादा रहा
राजा बना मोरा छैला कैसा - गरम मसाला
प्यार करता जा - भूत बंगला
बास... हाही खटाटोप फिझूल वाटतोय..
जय पंचम ! :)
