Aug 29, 2008

विडंबन: गझल - चकणा ! (मूळ गझल - वणवा)

मूळ गझल 'वणवा'  इथे   आहे

(किंवा ते ह्याच्या आधीचेच पोस्ट असल्याने सध्या ह्याच पानावर खाली पहावयास मिळेल :) )
'चकणा ' !बियर ठेव रे नीचा, जरा गोठवून आता

ढोसतोस कुठे वेड्या ह्या श्रावणात आताहाक मारिता त्याना, घोरती आत सर्व

घ्यायचे ना पहाटे का, मज घरात आताजिव्हा केव्हाच भिजल्या, आत्म्यास ओल आत

तरीही कोरडे अजूनी, वाटे घशात आताओरडण्याचीच खोड, जडली जी जनांस

'टाईट' होता टीका, करिती फुकात आतागांजले घरचे जरीही, तुझ्या दशेस रात्री

पड निवांत जरासा, त्या कोप-यात आता- राहुल फाटक

Aug 18, 2008

गझल - वणवा !

बहर ठेव मनीचा, जरा गोठवून आता

फुलतोस कुठे वेड्या ह्या वणव्यात आता


हुंकारिता वेदना, डोलती येथ माना

आक्रोशही करावा मग सूरात आता


जाणीवा सर्व विझल्या केव्हाच खोल आत

तरी धुगधुगे अजूनी काही उरात आता


खुरटण्याचीच खोड, जडली जनुकांस

उंचावयाची उमेद नाही अंकुरात आता


बांधले मोर्चे जरीही, एकेक दिशेस त्यांनी

काढ तुफान जे जपलेस अंतरात आता


- राहुल फाटक