Dec 23, 2008

पुणे ते दिवेआगर - मार्ग व टप्पे

माझ्यासारख्या geographically impaired लोकांसाठी कुठेही जायचे असेल तरी पहिला प्रश्न असतो ते म्हणजे कसे जायचे ?

माझे भौगोलिक ज्ञान हा एक अतिशय करुण इतिहास आहे ! वेळोवेळी याची तेजस्वी उदाहरणे मी दिलेली आहेत. (अर्थात कधीमधी मी इतरांना आणि स्वत:लाही चकीत करतो.)

तर ह्या मूलभूत भौगोलिक अशक्तपणावर मात करण्यासाठी कुठेही गेले की त्या जागेसंबधी उपयुक्त माहिती लिहून ठेवायला सुरुवात केली आहे. तुम्हाला कुणालाही याचा उपयोग झाला तर खूपच आनंद वाटेल.

टीप : 'खराब रस्ता', 'बरे हॉटेल' वगैरे व्याख्या व्यक्ती, वाहन, काळ, स्थळ, त्यादिवशीचे ग्रहमान वगैरेनुसार बदलत असतात ह्याची कृपया नोंद घ्यावी (आयला, पुण्यात राहिल्यावर हे अस का होतं सर्वसामान्य माणसाचं ?)

तर,


पुणे ते दिवे आगर :


मार्ग :

पुणे - पिरंगुट - मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव - दिवे आगर



अंतर व टप्पे :


क्र.
अंतर (कोथरुडपासून)
Kms
स्थळ नोंद
1.8.2BP Petrol pump (opp. daulat hotel, after ‘windmill’)
2.10.5मानस रिझोर्ट
3.11.7Shell Petrol Pump
4.12.7BP Petrol Pump
5.15.6Buninda Resort & BP Petrol Pump
6.15.8पिरंगुट सुरू
7.32.1जामगाव
8. 34.9‘माले’ खराब रस्ता
9.36.9Tata power – Mulshi (Camp booth)
10.45.1"Quick Bite" हॉटेलsnacks व जेवण
11.75.5ताम्हिणी घाट सुरु
12.86.6माणगाव फाटा माणगावापर्यंत खराब रस्ता
13.109.5माणगावमाणगाव गावात शिरल्यावर मुंबई गोवा हायवे (बहुदा!)आडवा लागतो (हायवे वगैरे अजिबात वाटत नाही. कारण वाहनांचा मंद वेग, बाजारची गर्दी वगैरे.) तिथे डावीकडे वळणे, मग बाजारपेठ.. काही अंतरावर ‘मोर्बा’ पाटी दिसली की उजवीकडे वळणे
14.129.5म्हसळा 8 km. वर.घोणसे घाट सुरु.
15.135.5चेक पोस्टआडव्या रस्त्यावर पोलिस चेक पोस्ट. तिकडे उजवीकडे वळणे. वळल्यावर लगेच ५ मिनिटावर petrol pump
16.137.5म्हसळा गाव बाजार. २ मिनिटावर रायगड जिल्हा परिषद चे office डावीकडे दिसेल. तिथून पुढे गेल्यावर ‘सुवर्णगणेश दिवेआगर’ अशी पाटी, तिथे उजवीकडे वळणे. (इथून दिवेआगर 20 km)
17.140दांडगिरी फाटा (इथून दिवेआगर 16 km)
18.155दिवे आगर ! गावात शिरताना 'सहर्ष' कमान. सरळ जाऊन 'T junction' ला गणेश मंदीराकडे जायला उजवीकडे वळणे. त्या रस्त्यावर सुमारे २-३ मिनिटावर मंदिर डावीकडे लागते. तसेच सरळ गेल्यावर उजवीकडे सुहास बापट यांचे घर (जेवणाची सोय). तसेच सरळ गेल्यावर रस्ता जवळजवळ संपतो तिथे डावीकडे woodland hotel.


अधिक माहिती :

  • अंतर एम. आय. टी. कॉलेज, कोथरुड पासून
  • जाता येता 'Quick Byte' हॉटेल मधे बरेच पदार्थ चांगले. पोहे, बटाटा वडा, सा. वडा, भजी, आलू पराठे व झुणका भाकर.
  • शेवटपर्यंत समुद्र दिसत नाही. गावात शिरल्यावरही नाही ! तेव्हा गोंधळून जाऊ नये :)

प्रवासासाठी शुभेच्छा !!!
http://rahulphatak.blogspot.com




7 comments:

Sameer said...

ek number varNan ahe.. am inspired.. pudhachya weekend la mi paN kokan daurayvar chalalo ahe..

Satish said...

Hi Rahul

Mi chalalo aahe Dive agar la ... thanks for the info. will use it.

Satish

shilpa said...

Tujhya sarkhach majha hi Bhugol farsa bara nahi. i remember...mala majha navra lagna adhi Sinhagadla gheun gela hota. after that kuthe hi jat aslo tari i ask him " we r going to sinhagad again." ajunhi majhe sagle raste nehmi Sinhagad lach jatat re. Tujha ha lekh wachun mala "Te" diwas parat athavle.....thnx.

Parag Kokane said...

राहूल,

रस्त्यामध्ये काही सुधारणा सुचवू शकतो का? (म्हणजे सुचवतोच आहे).

१२. माणगाव फाटा: सुधारीत रस्ता...

१. विळे फाटा.
२. विळे फाट्यावरून डावीकडे निजामपूर च्या दिशेने.
३. नंतर माणगावं.
४. माणगावंला मुंबई-गोवा (NH17), डावीकडे वळणे(म्हणजे गोव्याच्या दिशेने).
५. साधारण १०-११ कि.मी. लोणेरे गावं
६. लोणेरे फाटा - उजवीकडे वळणे, म्हसळा गावाकडे.


बाकी सर्व बरोबर असाव (बहुतेक), मी पुढे केळशी किंवा दापोली कडे वळतो म्हाप्रळ पासुन. त्यामुळे पुढे नक्की माहित नही. :P

पराग कोकणे

राफा said...

पराग,

मंडळ आभारी आहे. (सुधारणा म्हणजे तूला 'पर्यायी' मार्ग म्हणायचे असावे. मी लिहीले त्या मार्गाने गेलो व व्यवस्थित पोचलो :) ).

Parag Kokane said...

अरे पर्यायी मार्ग आहे पण दिला नहिये.. मी काही सुधारणाच सांगत होतो तू दिलेल्या मार्गावरच्या.

जसे,

माणगावं फाटा जिथे तू लिहिल आहेस.. त्याच नाव विळे फाटा असं आहे. आणि लोणेरे फाटा म्हणजे जिथे तू मुंबई-गोवा (NH 17) वरून उजवीकडे गोरेगाव ला वळतोस तो फाटा.

:)

राफा said...

मित्रा पराग, मी जसा गेलो तसे लिहीले बरे.. अमुक फाटा म्हणजे मुख्य रस्त्यावरून अमुक ठिकाणी जाण्याची फुटलेली फांदी अशी माझी समजूत आहे.. असो. विळे फाटा तर विळे फाटा.
मी पोचू शकलो ह्याचा अर्थ कुणीही सहज, न चुकता पोचू शकेल ह्याची वाचकांनी खात्री बाळगावी :).