आयशॉट !
सहावी 'ड' मधल्या ‘आयशॉट’ ला सारखे ‘आयशॉट’ म्हणायची सवय (‘आईशप्पथ’ चा झालेला तो अपभ्रंश). जसे जसे त्याच्या वह्यांतून सापडते तसे तसे त्याचे लेखन आम्ही प्रकाशित करत असतो. अगदीच वाचता येणार नाही तिथेच फक्त शुद्धलेखनाच्या चुका सुधारतो.. पण सर्व लिखाण त्याचेच.. त्याच्याच मनातले थेट वहीत उतरलेले.
त्याला स्वत:लाही त्याचे ते टोपण नाव ‘आतिचशय’ आवडते : आयशॉट !
***
निबंद लिहाव्यास सांगितला की माला आगदी प्राण घशापाशी येतात असे वाट्टे. पानचाळ सर आमाला नेमी नेमी निबंद लिहाव्यास सांगतात व स्वता टेबलावरती मान ठेवून झोपी जातात. ढापण म्हण्तो की ते अशा वेळी आगदीच सीता सयंवर इन फुजी कलर ह्या सिनेमामद्ल्या कुंबकरणासारखे दिस्तात असे म्हण्तो. (ढापण स्वताही चशमा लावलेल्या कुंबकरणासारखा दिसतो वर गात झोपतो तेवा). काही वेळा काही समाजकनटक मुले सरांच्या झोपण्याची नक्कल करितात ते त्यांना आजिचबात शोभत नाही. गुरुजनान्नी जरि मान टाकली तरि आपण मान ठेवावयास नको का ?
पानचाळ सर वर गात कदि कदि जागे आस्तात तेवा आतिचशय शांतता माज्लेली आसते. पण आज तास सुरु होऊनही खूप वेळ निघून गेला तरी सरांचा ठाव व ठिकाणा नवता. मग काही समाजकनटक मुलानी ऑफ तास असल्याची अफवा उठविली. पण टिवीवर सार्खे सार्खे सांगतात त्याचप्रमाणे आमी अफवेवर विशवास ठेवला नाही तसेच कुठल्याही सनशयास्पद वस्तूला हातही लावला नाही.
भाहेर आतिचशय कडाक्याचा पावूस पडत होता. आमी सवंगगडी खिडकीजवळ जमाव करून बाहेरील गोगल गायी बघू लागलो. गोगल गाय हा कधी भू तर कधी उभय चर प्राणी आसतो. तो नेमीच सरपटी जातो. उतक्रानतिचे टप्पे पडण्याआधी सगळेच जण सरपटी जायचे असे अंत्या म्हणाला. (वर राणारे भिंगार्डे आजोबा आहेत त्यांची घरी आजींपुडे गोगलगाय होते असे सगळे मोठे लोक म्हणतात बिलडिंगमदले. मी एक्दा लपून बघणारे की ते घरी सर्पटतात का ते म्हन्जे त्यांची उतक्रानती झालीये का ते लगेच कळेल. चवकस दुष्टी हे विदन्यानिकाचा गुण आहे असे विदन्यान्याच्या वाटसरे बाई म्हण्तात) अंत्या वाईट म्हण्जे आतिचशय हुशार आहे. जितू म्हणला की अंत्या नेमी मशिन लावून नांगरल्यासार्खे केस कापतो त्यामुळेच त्याचे डोके सुपीक झाले आहे. तो साच्लेल्या पाण्यातून तसेच कोरडवाहू जमीनीवरून सर्पटत सर्पटत चालू शकतो. (तो म्हन्जे अंत्या नव्हे तर गोगल गाय हा प्राणी).
असे आमचे गोगल गायिंचे विदन्यानिक कोनातून बघणे चालू आस्ताना अंत्याने गंबिरपणे एक मऊलिक प्रश्न केला की तो म्हण्ला की तुमी कधी विचार केलात का तुमी की गोगल गायी आपल्याकडे कशा कोनातून पहात आसतील? खरोखरच अंत्याचा मेंदू चवकस व धारदार आहे. मग जितू म्हणला की गोगल गायीना तर आपण राकशस वाटत आसणार. (आणि ढापण म्हन्जे चश्मिस राकशस. कुम्बकरण कुठचा)
ढापण काही बोलणार एवड्यात खेकसण्याचा आवाज आला. पानचाळ सर वर गात आले होते. सार्याना पळो की सळो झाले. मी घाबरून कसाबसा लपून गोगल गायीसार्खा सर्पटत सर्पटत माझ्या शेवटच्या बाकापरयंत पोचलो व चडून बसलो. सराना झोप आगदीच आसह्य होत होती असे त्यांच्या डोळ्यांकडे व हाल चालीकडे बघून वाटले. आमाला पुरेसे ओरडून झाल्यावर्ती त्यान्नी आम्हाला हिवाळा ह्या विश्यावर निबंद लिहावयास सांगितला व नेमीप्रमाणे टेबलावर मान टाकली.
आता पावूस पडत आस्ताना हिवाळ्याचे दिवस कसे बरे आठवणार ? पण सरांच्या गळ्यात घंटा कोण बांदणार ? त्यामुळेच आम्ही मुकाटपणाने लिहू लागलो.
हिवाळा हा रुतु माला आतिचशय आवडतो. आगदी सुरुवातिला थंडी पडते तिचा रंग गुलाबी आसतो. खरे म्हन्जे माला थंडी मला दिसतच नाही कदी तर रंग कसा कळणार ? पण सगळेच गुलाबी म्हणतात म्हन्जे ते खरे आसणार. हिवाळ्यात लोक कपडे घालतात जे की इतर रुतुत घालत नाहीत (लोकरीचे असे लिहावयाचे राहिले ते कंसात लिले आहे)
विशेश्ता मुसळधार थंडी पडते त्या दिवशी लोक लोकरीचे कपडे घालतात. उन व पावूस आकाशामदून जमिनिकडे खाली येतात. तशी थंडी कुठून येते ते कुणालाच समजत नाही. पण नोवेम्बर मैन्यात ती खाली येऊन साचू लागते व वारा वायला की इकडून तिकडे जाते. बकरी हा आतिशय उप्योगी पाळीव पशू आहे. तो दुध तसेच लोकरीचे गुंडे वगैरे उपयोगी गोशटी रोज सकाळी आपणास देतो. लोकरीच्या गुंड्यापासूनच कपडे बनतात नाहीतर हिवाळ्यात लोकानी काय केले आस्ते ह्याचि कल्पनाच कर्वत नाही. गाय हाही आतिचशय उपयोगी पशू आहे पण तो लोकर देत नाही तर फक्त दूध देतो. गोगलगाय तर दूध व लोकर दोन्ही देत नाही त्यामुळेच तो हिवाळ्यात भूमिगत होवून दिसेनासा होतो. फक्त पावूसाळ्यात कळपाने बाहेर पडतो.
हिवाळ्या रुतुमधे फळे तसेच फळावळ आतिचशय छान मिळतात. फळांमदूनच आपणास वेग वेगळ्या आक्शरांची जिवनसतवे मिळतात. (ती ह्या वरशी सामाईला पाच मारकांना आहेत). हिवाळ्यात दिवाळी, नाताळ, बालदीन, ख्रिसमस असे सणासुदीचे दीन येतात. तेव्हा शाळेला मधे मधे सुट्टी आसल्याने सरवत्र मंगलमय वाता वरण आस्ते. सुट्टीच्या शेवटच्या दिवशी मात्र प्राण आगदी घशाशी येतात. कारण पहिल्या दिवशी सर्व बाई आणि सर सामाई परिकशेचे तपासलेले पेपर वाटतात. अंत्या नेमी पैला येत आसल्याने तो मात्र आतिचशय खूश आसतो.
हिवाळ्यात दरडी व कडे कोसळत नसल्या ने तो पावूसाळ्या सार्खा प्राण घातक रुतु नाही. तसेच थंडीमुळे शेवाळे व निस रडेपणा होत नाही. त्यामुळे पुटफाथ वरुन जाणारी वाने व रसत्यामधून जाणारे पादचारी ह्यांची पडझड होत नाही. तसेच उनाचा त्रास होवून उशमाघातही होत नाही. थंडीच्या रुतुत सर्व पदारथ प्रर्सण पावू लागतात. त्यामुळेच हिवाळ्यात मुले गुट गुटीत व सुदरुढ होण्यास चालना मिळते.
फक्त शाळेत जाताना माला माकडटोपी घालायाला अजिचबात आवडत नाहीत. कारणकी तशी टोपी घालून निट आयकू येत नाही. मी रिकशासाठी उभे अस्ताना समोरचे जे राणारे आहेत तेंच्याकडे आलेली ती मुलगी जी माज्याचएवढीच आहे ती बाहेर येउन बघते आणि माज्याकडे पावून तोंडावर आडवा हात धरून हासत बसते. मग मी चिडून माकडटोपी काढूनच टाकतो पण थंडी जोरात येउन कानावर वाजते. परवाच्या सकाळच्या दिवशी ती हासता हासता म्हणाली की आमाला माकड आणि टोपीची गोशट माला माहितच आहे मुळी असे म्हणली. मी चिडून तिला मारावयाला जाणार होतो पण त्यांच्या बंगल्यात अल सेशन कुतरा आहे. तो पाळिव आसला तरी मोठा पशू आसल्याने मी राग खावून टाकला व थंडीपासून प्राण वाचवण्याकरिता कान दाबून ठेवले. हिवाळ्यामुळेच माला वाईट साईट न आयकणार्या माकडाप्रमाणे कानावर हात ठेवायची शिकवण मिळाली.
असा हा हिवाळा रुतु माला खूप खूप आवडतो मितर व मयत रिणीनो.
आयशॉट उरफ राफा – सहावी ड
30 comments:
hiii
nehemipramane bhareeee..............
aatishayach aawadale......... :) :)
नमस्कार राफा!
खरं तर तुला काय लिहु हेच नक्की होत नाही... म्हणजे जेंव्हाही तुझे लिखाण वाचतो... आईशप्पथ [आयशॉट] अगदी मनापासुन हसतो.... कसं जमतं यार?
असो.. कंटाळवाण्या दिवसात तुझी एक पोस्टही फ्रेश मुडसाठी खुप असते!
असंच लिहित रहा!
भुंगा
Thanx Yogini, Avani & Bhunga :)
@Avani : Tumhala 'aatichashay' aawadale mhanayache ahe ka ? :)
@भुंगा : ह्याचसाठी केला होता अट्टाहास :) .. चक्कर मारत रहा... दर वेळेस थोडा फार तरी 'मध' मिळेल नक्की !
kharacha mast lihil ahes.. vachatana khoop maja yete
Thanx Vaibhavi :)
:)))) अफ्रतीम (म्हणजे अप्रतीम, हे आयशॉट ला सांगणे न लगे) !! मराठी अशुद्धलेखन जे काही खास जमलंय तुला ! हसून हसून पुरेवाट झाली. प्लीज हे पराग ला वाचायला दे ना...मराठी शुद्धलेखनाचा हा प्रकार वाचून बिचारा मराठी वाचणं कायमचं बंद करेल.
हे वाचताना डोळ्यातून पाणी आलं (अती हसल्यामुळे !) -
"उतक्रानतिचे टप्पे पडण्याआधी सगळेच जण सरपटी जायचे असे अंत्या म्हणाला. (वर राणारे भिंगार्डे आजोबा आहेत त्यांची घरी आजींपुडे गोगलगाय होते असे सगळे मोठे लोक म्हणतात बिलडिंगमदले. मी एक्दा लपून बघणारे की ते घरी सर्पटतात का ते म्हन्जे त्यांची उतक्रानती झालीये का ते लगेच कळेल. चवकस दुष्टी हे विदन्यानिकाचा गुण आहे असे विदन्यान्याच्या वाटसरे बाई म्हण्तात)"
"हिवाळ्यात लोक कपडे घालतात जे की इतर रुतुत घालत नाहीत (लोकरीचे असे लिहावयाचे राहिले ते कंसात लिले आहे)"
"थंडीच्या रुतुत सर्व पदारथ प्रर्सण पावू लागतात. त्यामुळेच हिवाळ्यात मुले गुट गुटीत व सुदरुढ होण्यास चालना मिळते."
मंडळ आपले अतीचशय आबारी आहे. पुंन्हां भेट होईलच :)
Shachi :)) ! आयशॉट ! तुला आतिचशय आवडले हे आयकून फार्फार आनन्द झाला..
लोकांच्या डोळ्यातून पाणी काढणे (हसवून !) हा तर आवडता छंद... ज्याने फार समाधान लाभते. (फार्फार वर्षांनी सत्कार वगैरे झाला तर वाक्य चांगले आहे टाकायला :))
पराग ला वाचताना खड्यांमधून तांदूळ निवडल्यासारखे वाटेल (त्यामुळे सांगतोच वाचायला :)) शिवाय मी नाही तर माझ्यातल्या आयशॉटने लिहीले असल्याने मला चिंता नाही :)
धन्स पुन्हा एकदा !!!
shree raa. raa. aayshot tatha rafa yansi
kru. shi. saa. na. vi. vi.
patraas kaaran kee aapale lekhan vaachataanaa faar traas jhaalaa. haasyakaarak vidhaananmuLe utpanna zaalelyaa hasanyaane asmaadikaanche kapoldwaya dukhoo laagale. taree yaapudhe lihitaana vaachaNaaryaannaa evadhe hasoo phutaNaar naahee yaachee kaaLajee ghyaavee ashee namra vinantee aahe.
kaLaave,
aapalaa namra,
paraag
Shree ra. ra. Paraag yansi,
kru. shi. saa. na. (vilambit),
aapale patra vaachun atishay santosh jahalaa. Shatashah Dhanyawaad !!!
aayashOTalaahi patra jasechya tase vaachun dakhavale. Tevha tyane 'kaakaani patra maraathit ka nahi lile' ase vicharale. Tyala bhavaartha samajavun dilyaanantar matra to anandaane udyaa maru lagalaa va tyaanehi aapanaas 'thyankyu' saangitale aahe ..
kalave asach lobh asawa hi vinanti,
aapalaa namra,
Raaphaa
ASTALAVISTA................ Mind Blowing......
Maza vachan speed 400-450 wpm aahe..... pan AaayShotT wacaayala purn 20 minite laagtaat bara ka....... Fast waachoon majach yet naahi bilkul.....Fast wachlyaawar khara joke Index hot naahi menduchya search engine war.......LOL faarach Sundar.....Keep Going....
Thanx a ton Hrishikesh ! .. next time i will also mention recommended speed limit (for reading) :)
zakas re aayshot.. tu asa adhun madhun gayaba nako hota jau rava
धन्यवाद मीनूजी ! गायब झाल्याशिवाय प्रकट होता येत नाही ना :) .. अचानक आयशॉटशी गाठ पडली की त्याचे मनोगत सांगायला मज्जा येते.
hi Rahul, i just read ur blog...nice one, Dhhmal lihitoh re tu......mi atta office madhe basun ha lekh wachat hote.....but i cant control....jorat hasayla surwat keli mi....all is shock...hila kay jhala...its just coz of u....thnx...
शिल्पा, मन:पूर्वक धन्यवाद ! ह्या व इतर लिखाणाला सढळ हाताने दिलेल्या उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल :) (किती 'मेमो' मिळाले ऑफिसमधे हसण्याबद्दल ? :))
हिवाळा कुठुन येतो ..:) मस्त....
आयशॉटची कमाल आहे. वहिची पान जरा जास्त उलगडा... एकदम मजा येईल.
dhanyawad Milind :)
जितू म्हणला की अंत्या नेमी मशिन लावून नांगरल्यासार्खे केस कापतो त्यामुळेच त्याचे डोके सुपीक झाले आहे.
lol...
जिकलस की.....
Thanx Smit :)
आयशॉट ! आतिचशय आवडले
Aparna, आतिचशय Thanx :)
हहपुवा!!! :D:D:D:D
"गुरुजनान्नी जरि मान टाकली तरि आपण मान ठेवावयास नको का ?"
एकचदम भारी!!! :)
भालचंद्र, एकचदम धन्यवाद :)
कडाक्याचा पावूस, मुसळधार थंडी :)
धमाल येतीये या आयशॉटला भेटताना....
तन्वी (आयशॉट उगा ’सहजच’ नावाने आभार मानेल नं म्हणून माझे नाव दिलेय ;) )
तन्वी ('सहजच' नाव लिहीतोय :) ): पुना एकदा आत्यंत आबार ! :)
mast, maja aali. warachya majalya warache aajoba ekdam bhari :)
आरती, Thanx a lot ! :)
Apratim.. Kharach hasun dolyat pani aalay..!! :D
Thanks a lot Shweta! :)
Post a Comment