Sep 19, 2010

‘आयशॉट’च्या वहीतून : आम्च्या सोसायटीतला गणेशोत्सव !

एणार एणार असे हा हा म्हण्ताना गणेशोत्सव हा सण येऊन ठेप्लाच. गणेशोत्सव हा शब्द माज्याकडून १२१ वेळा महामरे बाईनी लिहून घेत्ल्यामुळे मी आता अजिचबात चुकत नाही.

मला गणपती बाप्पा आतिचशय आवडतो. कारण कि तो चांगली बुद्दी देतो जी की परिकशेच्या वेळेस उपयोगी पडते. गणपती बाप्पा विद्येची देवता आहे. पानचाळ सर म्हणतात की प्रत्येक देव कशा ना कशाचा तरी आधी पती आहे. दर परिकशेच्या वेळी विशेशता वारशिक च्या वेळी मी गणपतीची रोज मनो भावे तपशचरया करतो. पण चांगली बुद्दी देण्याच्या आयवजी गणपती बाप्पाने डायरेक चांगले मारक दिले आसते परिकशेत तर किती चांगले होइल. आपण सरवांनी कोणच्या तरी देवाची रोज कमीत कमी तपशचरया कराव्यास हवी (१० मिन्टे लिहावयाचे राहिले ते कंसात लिले आहे).

गणेशोत्सव असतो तेवा सरवत्र आतिचशय मंगलमय वातावरण आस्ते. बाजारात सुद्दा ने वेद्याचे मोदक पेढे व बरफी असे बोर्ड लागून दुकानांची शोभा वाडलेली आसते. सरवत्र रोश्णाइ व लाय टींग केलेले आसते. ते काईकाई वेळा फिरतेही आसते. म्हन्जे की ते तिथेच आस्ते फ्क्त लाईट फिरत असतात पकडा पकडी खेळल्यासार्खे. ठिक ठिकाणी मंडप उभारून रसत्यांची व वातूकीची शोभा वाडवलेली आसते. मंडपाशेजारी स्पिकरांची एकावर एक दहीअंडी करून त्यावरून नवीन हिन्दी पिच्चरमदली गाणी करणमधूर आवाजात लावलेली आसतात. फक्त त्या आवाजात गणपती बाप्पाला लोकांची तपशचरया ऐकू जाईल का अशी मला नेमी भिती वाट्टे.

आमच्या सोसायटीतही गणेशोत्सव असतो मदल्या चौकात. त्या काळात मुले मुली, तसेच प्रोढ व मोठी माणसे तसेच बायका वगेरे आतिचशय उतसाहाने फसफसत आसतात. बायकांमदे रोज बाप्पाला नवनवीन ने वैद्य टिवीत बगून बनवायची चडाओड लागते. ने वेद्य काय आहे त्यावर आरतीला गरदी आसते असे सागरगोटे काका म्हणताना मी आयकले. दरेक दिवशी आर्ती करताना सरव मुले कडव्याची पैली ओळ मोठ्या आवाजात म्हणतात व नंतर आर्ती पाठ नसल्याने मोठ्या लोकानच्या तोंडाकडे पहात बसतात. साठेंचा मुलगा हात जोडून नुस्ता ने वेद्याकडे पहात आसतो. नेनेन्चा राजू दादा प्रदानांच्या पिन्की ताइकडेच पहात आसतो एकसार्खा असे सिकरेट जितूने सांगितल्याने आमी सरव लहान मुलानी खातरी केली. पिन्की सुद्दा मदेमदे पाहत एडपटासार्खी हासत होती. कोलेजमदल्या एवड्या मोठाल्या मुलाना हे सुद्दा कळत नाही का की आर्तीला गंबीरपणाने उभे रहावयाचे आस्ते ? पिन्कीची तपशचरया करून राजू दादाला काय मिळनार ते बाप्पाच जाणे. ह्या वरशी आसे केले तर मी सरळ मोठ्यादी ओरडनार आहे ए राजू दादा समोर बघ म्हणून आसे.

काई काई गोशटी मात्र मला बुच कळ्यातच पाडतात. आता जासवंदीचे फूल आवडते म्हून काय रोज तेच तेच काय फूल वहायचे. बाप्पाला तरी वरायटी नको काय ? मला जिल्बी आवडते म्हणून काय रोज दिली तरी मला कंटाळाच येईल नाई का दोन तिन मैन्यानी. मस्त लाल गुलाबाचे फुल दिले आणिक ने वेद्याला चोकोलेट दिले तर देव नाई म्हण्णार आहे का ? पण मोठी लोक आइकतील तो सुदीन.सरानी आमाला एकदा चंदराची गोशट सांगितली की जेवा तो गणपतीला हासला होता उंदरा वरतून पडल्यावर्ती. मग गणपतीने त्याला शाप दिला. आसे कोणाला पडल्यावर हासणे म्हन्जे आगदीच वाईट आसते. पण काई काई वाईट चालि आणि रिती आपल्या समाजातून जाता जात नाईत असे वरगातला अंत्या म्हणाला. एकदा गुंटुरकर सर शाळेसमोर चालताना असेच केळ्याच्या सालीवर्तून अरधवट घसर्ले होते तेवा आमी हसू येवूनही अजिचबात हसलो नाही. ते दूर गेल्यावर्ती मग ढापण फिसकिनी हसला तेवा मात्र आमी सरव हमसाहमशी हसू लागलो.

आमच्या सोसायटित गणेशोत्सवात दरवरशी सांसक्रुतिक तसेच मनोरन जनाचे कार्यक्रम होतात. ते पैल्या दिवसापासून ते पार विसर जनाच्या दिवसापरयंत चालू आसतात. सरव वयो गटानसाठी स्पर्दा ही अस्तात. वकतरुत्व, आभिनय, लाम्ब उडी चमचा, लिंबू कवितावाचन बुद्दि बळ तसेच एका मिन्टात गुलाबजामू खाणे अशा स्पर्दा अस्तात. मागील वरशी साठेंच्या मुलाने चमच्या आयवजी लिंबू तोंडात धरून गिळले व तो कासा वीस जाल्यावर डॉकटराना बोलावयास लागले त्यामुळे त्याला ह्या वरशी स्पर्देत संचारबंदी होति. पण तरी त्याने गनिमी काव्याने जाऊन १२ गुलाबजामू गिळलेच तेही ती स्पर्दा सुरु व्हायच्या आधीच. मग त्याच्या पोटात दुखू लागल्याने ह्यवेळीही डॉकटर बोलाववयास लागणार की काय अशी चरचा चालू जाली.

मागच्या वरशी आमा लहान मुलांचे नाटक जामच सॉलिड झाले होते. सरव काम करणारी मुले उल्लसित वाता वरणात सभागी झाली होती. नाटक आतिचशय मस्त जाले फक्त घाईतघाईत राजाची आणि प्रदानाची सुरुवार अदलाबदल झाली होती. राजाची सुरूवार पैल्यांदा सिंवासनावर बस्तानाच सुटू लागली होती त्यामुळे नंतर तो सिव्हासनावरून उठेचना. लढाईला जायलाही ते शेवटी निघेना तेवा सिंवासनासकट त्याला उचलून विंगेमदे नेले. सरवांची हसून हसून बोबडीच वळाली. त्यात सागरगोटे काकांनी ‘उचलून नेलेत पण आता राजाचे विसर जन करु नका रे’ असे म्हणल्यावर तर आमी हसून हसून चारी मुंड्या चित झालो. सागरगोटे काका नेमीच कॉमिक बोलतात असा त्यांचा ए विंगमधे लवकिक आहे.

नंतर कविता वाच नाचा कारयकरम येवून ठेपला. भाएरून काही काका वाच नाचा साठी एणार असल्याने भरगच्च गरदी दिसाव्यास हवी म्हणून आमा मुलानाही बसविले होते कमपलसरी. सुर्वातीला पैले मिशि नसलेले नुस्तीच एक टोकवाली त्रिकोनी दाढि आसलेले काका उठले व माइक चेक कराव्यास काहितरी पुट पुटले व जागेवर जावून बसले तर लोकाननी टाळ्याच वाजविल्या. नंतर मला कळाले कि ते माइक चेक करत नवते काय तर त्यानी हायकू नावाची छोटी कविता पटकिनि म्हणली होति. (हायकू हा जपान देशामधे उगवलेला कविता वाच नाचा एक प्रकार आहे असे भिंगार्डे आजोबा आमाला नंतर म्हणाले) मग लगेच एक चशमा आसलेले काका उठले. त्याना मिशि होति व त्रिकोनि वा कोणचीच दाढी नवती. त्यानी नाकावर चशमा ठेवून त्यावरतून असे रोखून पायले की मला भुगोला च्या सरांची आठवण येवून एकदम छातीत पायाखाल्ची वाळू सरकलयासार्खे वाटून धस झाले. मग असे सरवाना पाहून घेतल्यावरती त्यानी जी गणाघाती सुर्वात केली की ते थांबेच नात. सरव लोक चूळ व बूळ कराव्यास लागले. काही समाज कनटक मुले पुढच्या बसलेल्यांना हाताने शेनड्या लावावयास लागून खुसुपुसु हासू लागली. तरीपण त्या काकांचे चालूच होते. त्यांच्या मागे अजून काका बसले होते कविता म्हणाव्यास ते झांबया देवू लागले. मला जाग आली तेवा सरव लोक उठू लागले होते.

त्याच्या फुडच्या दिवशी मोठ्या लोकानसाठी ‘प्रदुशणाची समसया’ ह्या विशयावरती एक व्याखान संद्याकाळी होते. (महामरे बाईंनी आमाला प्रदूशणातला श हा पोटफोड्या शहामुगातला आहे असे सांगितले आहे) आमा मुलानाही ह्या दुरधर समस्येची ओळख वावी म्हणून भिंगार्डे आजोबांनी आमाला गणेशोत्सवाच्या त्याच दिवशी सकाळि सकाळि पाटे अण्णासाएब गुडगुडे पुलावर नेले होते. पण तिथे वानांचा धूर व धूळ इत्की होती की बरयाच मुलाना प्रदूशण कुठे दिसलेच नाही. वानांच्या होर्नांमुळे भिंगार्डे आजोबा काय सांगत होते तेही आयकू येत नवते. त्यामुळे सरव जण अनदाजाने अनदाज बांदत होते. संध्याकाळि व्याखानाला माला फार झोप येत होती पण घरच्या लोकानबरोबर बसावे लागले गरदी दिसावी म्हणून. आवाजाच्या प्रदुशणामुळे खोकला तसेच वानांच्या धुरामुळे भैरेपणा येतो असे काहीतरी एक काका सान्गत होते.

हा हा असे म्हणतानाच विसर जनाचा दिवस उगवला. फुडच्या वरशी लवकर येण्याचे बाप्पाला सांगून आमी मागच्या वरशी त्याचा निरोप घेतला. आणि आता हा हा म्हणतानाच ह्या वरशीचा गणेशोत्सव आला सुद्दा !

गणपती बाप्पा मोरया ! (हेही महामरे बाईनी १२१ वेळा लिहून घेत्ले होते)- आयशॉट उरफ राफा - सहावी ड&nbspह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

18 comments:

स्वप्ना said...

राफा ,लई झक्कास रे!आज पहिल्यांदाच तुझी पोस्ट वाचली.(कारण ती मला आजच दिसली म्हणून)
याच शुद्धलेखन जो सुधारायला जाईल तो स्वत:चेच विसरेल इतके भारी आहे !!!!!!
शुद्धलेखन सुधारण्यासाठीचे नमुने म्हणून उपयोगी आहे हे!!!
क्लासच रे.....कल्ला.......

राफा said...

Thanx Swapna :)

अपर्णा said...

लोळालोळी..........welcome back after the break RF....(aaila he roger feddy chi rhiming madhe aahe yaar...)

राफा said...

Thanx अपर्णा !
लोळालोळी >>> हे आवडलं :)
राफा चे RF केलेस तर फेडरर आणि राफा ठेवलेस तर नदाल (win win situation म्हणतात ती हीच ! :) )

shreyas said...

rapha, uchcha aahe! kahi kahi vakya zabarya jamaliyet!!!

राफा said...

Shreyas, manDaL abhari ahe :) !

श्रिया said...

हेरंब ह्याच्या कृपेने buzz वर सापडले हे पोस्ट आणि वाचून खूपच धमाल आली! राफा तुमचे लेखन तुफान आहे....:)

mau said...

प्रचंड!!!!!
हेरंबच्या कृपेने बझवर मिळाले...मुकले असते नहितर ह्या पोस्ट्ला...लिखाण जबरी...

mynac said...

सर्व प्रथम हेरंबचे मना पासून आभार आम्हाला इथ पर्यंत घेऊन आल्या बद्दल.
राफा, हा झाला मागच्या वर्षीचा तुझ्या सोसायटीचा अहवाल.आता आम्ही सगळे ह्या वर्षीच्या गमतीजमतींची वाट पहातोय.
तुझा मागच्या वर्षीचा अहवाल,यंदा म्हणजे खूप लेट..असा तुज्या एका मित्राच्या वाचनात आला,त्याचा अभिप्राय त्याने आमच्या जवळ दिला आहे तो कृपया वाचावा.. ह्या भन्नाट लेखा बद्दल पुन्हा एकदा तुला धन्यवाद नि पुढील लेखना साठी शुभेच्छा.
हा राफा लय खोड साल हाये.आमच्या स्वसाय टीच्या गोष टी,त्येत कै खाज्गी बी असत्यात त्या बी लोकां फुढे आंतो.पन कुनीतरी त्या पबलीक परयंत फोचवतय हा मणाला आणंदे.पन, नेनेनच्या राजू ची नि दादा प्रदानांच्या पिन्की ताइ ची यल.यफ.डी. केस म्हंजे लफड्याची केस त्याने पबलीक समोर वोपन करून फुकाटची दूषमणी वोढवून घेत्लीये आस मी नम्रपने णमूद करतो.पन जे व्हत,ते चान्गल्या साठीच आस पटवरधण बाई म्हंत्यात.
खाज्गी ,
राफा तू लय खास लिवलंय.कामबळे सर आज तुज्या बीणचूक सुद्द लेखणा वर ज्याम खूश दिसत व्हते.त्येंच्या शिकवन्याचा कै तरी वूप्योग व्हतोय हे
बघूण त्येन्ला खूप बर वाट्ल.

भानस said...

मला हेरंब आणि उमामुळे ( माऊ )इतका भारी गणेशोत्सवाचा वृन्तांत वाचायला मिळाला. नुसती हसतेच आहे मी. शब्दांची तोडफोड खूपच झकास केलीस. लय भारी! आता आधीचेही वाचते... :)

" गणपती बाप्पा मोरया !"

विक्रम एक शांत वादळ said...

KaychyaKay Bhari ;)

दीपक परुळेकर said...

प्र ह च हं ड ह !!!!

भावा काय जबराट लिहिलेस रे !!!

DhundiRaj said...

अस्खलित लिहिलयस ......!

राफा said...

उशिरा प्रतिक्रिया (प्रतिक्रियांवर) देत असल्याबद्दल क्षमस्व.

सर्वप्रथम हेरंबचे मन:पूर्वक आभार !!! त्याच्या buzz मुळे एव्हढे रसिक वाचक एकाच दिवशी 'आयशॉट' ला लाभले. स्वत: एक अत्यंत लोकप्रिय ब्लॉग लिहीत असूनही हेरंबने आयशॉटसारख्या ढ मुलाच्या लेखनाची दखल घेतल्याबद्दल पुन्हा एकदा खूप धन्यवाद ! :)

श्रिया, mau, mynac, भानस, विक्रम, दीपक, dhundiRaj : तुमच्या दिलखुलास व उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार !

@mynac : 'बीणचूक' प्रतिक्रियेबद्दल पुन्हा आभार :). आयशॉट यंदा गणेशोत्सवाच्या विविध कार्यक्रमात (मुख्यत: नाटक !)गुंग असल्याने त्याला लिहाव्यास अजिचबात जमले नाही ह्या वर्षी !

Hrishikesh said...

HATS OFF........ Ohh... GOD....
you are the man !!!!!

It wasn't a laugh..... It was "GAG"
i had to take a painkiller for the stomach pain i got.... Of course ... cause of laughing......


Hope u publish somthing in the hard....


all the best for the next ........

राफा said...

Thanx a lot Hrishikesh !!!
seems you are here almost after a year ...

tejali said...

shudha ashuddhalekan 100 paiki 100 marks

राफा said...

Thanx a ton Tejali !!!