Nov 21, 2011

‘आयशॉट’च्या वहीतून - माझा आवडता पकशी !

झुरळ हा पकशी आहे काय ? ह्या अंत्याच्या प्रश्नाने आमी गानगरुनच गेलो. अंत्या मदेच असे पायाखालची जमिन सळो कि पळो वाव्ही असे प्रशन विचारत आस्तो. पर्वा त्याची कटिंग जालेली आसल्याने तेच्या भांगाची लाइन दोन शेतामदल्या बांधासारखी दिसत होति व दोनी बाजूला साइडला हिरवे व मदे काळेकबिन्न अशा कापलेल्या केसांचे शेत त्याच्या डोक्याच्या वरती पसरले होते. खरोखरिच अंत्याचे डोके फारच सुपिक आहे ज्यातून की कुठला प्रशन कोणच्या वेळेस उगवेल हे कोणालाच सांगता येत नाही. (माईणकरच्या मात्र उजव्या मेन्दुची अवाजवी वाढ झाल्याने त्याचा भांग नीट पडत नाही).

आमाला मराठीला आमच्या रुशितुल्य महामरे बाई जाउन चिरके नावाचे आतिचशय हिनसक व मार कुटे सर आले आहेत. पैल्या दिवशीच तुम्चा आवडता पकशी हा निबंद लिहुन त्यानि आणाव्यास सांगितले आसल्याने आमि सर्व विचारान्च्या गरतेत तरंगत होतो. सर तासभर घसा खर वडून ओरडून जाल्यावरती जेवा दुस-या वरगात जाण्यासाठी अंतरधान पावले तेवा अंत्या सरांच्या खुर्चिमदे जाउन बसला व त्याने वरील मऊलिक प्रश्न केला. सरव जण एकमेकानच्या मुकखमलाकडे टका व मका पाहू लागले.

काही झुरळे उडत आसली तरी झुरळाला चोच नसल्याने तो पकशी नाही असे बाणेदार उत्तर ओतुरकरने दिल्यावर अंत्यासुद्दा चकित झाला. मिसुद्दा झुरळ घरटे बांदत नसल्याने तो पकशी नाहीच असे तेजसवी उत्तर दिले. तेवा नेमीच चप्पल अथवा बूट शोधाव्यास उदयुक्त कर्णारे झुरळ कोणाचेच आवडते नसल्याचे सरवांच्या निदरशनास आले. त्यामुळेच त्यावर निबंद लिहू नई कारण की तो पकशी समजा आसला तरी आवडता अजिचबात होणार नाही असे सरवामुनते ठरले. हि भरुन वाहून चाललेली एकि पाहुन मला चवथि यत्तेमदिल एकिचे बळ हा धडा आठवून माजे रुदयही लगबगून आले.

आता आवडता पकशी शोदण्याच्या मोहिमेत गुनतून आमचे मन पकश्याप्रमाणेच कलपनेच्या आकाशात विरहू लागले. वेग वेगळ्या पकश्यांच्या विचार करताना मला तर आतिचशय गोंधळल्यासारखे होवून धडधडू लागले होते. कोणाचा रंग माला आवडे तर कोणाची चोच तर कोणाची शेपूट. कोणाचे आकार मान आवडे तर कोणाची नुस्तीच मान.

मला बगळा हा नेमी आनघोळ करुन भांग पाडल्यासार्खा स्वछ्छ दिसत आसल्याने आतिचशय आवडतो. त्यावरती मी निबंद चालू कर्णार तेवाच लक्शात आले कि त्या पक्शाचे चित्रहि निंबदाशेजारी सरानी काढून आणाव्यास सांगितले आहे. आता पांड-या कागदावरती पांडराच बगळा कसे बरे काढायचा ह्या प्रशनाने माजी दुपारची झोप बगळ्यासारकी उडाली. बगळा उबा राहतो त्याप्रमाने मी कॉटवरतुन एक पाय खालि सोडूनही विचार करुन पाहिले पण पांड-या रंगाचा प्रशन तसाच लटकत रायला. शेवटी मग मी बगळ्याला मनातून हुस कावून लावले व इतर उडणारे प्राणी आठवू लागलो. जन्नी ही शोधाची गरज आहे हे वाटसरे बाईंचे अलवकिक वाक्य आठवून जिव थोडा जिवात आला व मी माजा आवडता पकशी शोधू लागलो.


शेवटी मग ज्याचे चित्र काढाव्यास सोपे तो आवडता पक्शी मानून घ्यावा असे मी मनाशी पक्के केले. एक दोन वेळा प्रयत्न केल्या वरती ही पोपटाचे चित्र जमेना. कधि तो हिरव्या मिरचि प्रमाणे पातळ येयी तर कधि भोपळि मिरचि प्रमाणे जाड येयी. कदी त्याची चोच एवडी जाड येयी की त्या वजनाने तो कायम मान खालीच घालेल आसे वाटे. माजाच सारखा सारखा पोपट होवू लागला असे वाटून स्वतावरती निबंद लिहाव्याच्या कलपनेने मला आत्यंत हसू आले. हासू हे आसूंवर्ती लावायचे राम्बाण मलम आहे हे वाटसरे बाईंचे अजून एक अलवकिक वाक्य आठवले.

कावळ्याचे चित्र सोप्पे आसे वाटतानाच काळ्या कावळ्याचा काळा डोळा त्याच्यावर काडला तरी तरी दिस्णार कसा हा प्रशन खिडकीच्या अरध्या दारावर येवून बसणा-या कावळ्याप्रमाणे माज्या मनात येवून बसला. कावळ्यास एकआक्ष म्हणजे एक डोळावाला असे म्हणतात त्यामुळेच तो एक डोळा पलिकडच्या साईडला आहे असे समजा असे सांगितले तर सराना पटणार नाही असा विचार मी करुन मी कावळा सोडून दिला. चिमणीचा रंग हा आंगी कलर असतो का तपकिरी हा प्रशन पडला होता. मोठी चोच आसलेले पोपटाचे चित्र शिंगचोचा हया पकश्याचे आहे असे सांगितले आस्ते पण शिंगचोचाविशयी त्याला चोचीसार्खे शिंग आस्ते ह्याशिवाय काहीच माहिति नवती. आता कोण्तेच चित्र ठरेना त्यामुळे निबंद कसा लिवावा असा मी भयनकर बुच कळ्यातच पडलो.

शेवटी माजी नजर प्रदान कडून आणलेल्या ब्याटम्यानच्या कॉमिक वरती पडली व मी आननदाने युरेका असे ओरडलो. आणि अबब ! एक वटवाघूळ माज्या मनात रुनजी घालू लागले. आकाशात लाम्ब विरहत आसल्याने त्याचे डोळे दिसावयाचा प्रशन नवता त्यामुळे ते चित्र काढाव्यास आतिचशय सोपे वाटले. मला उचन बळून आलेले आस्तानाच कॉमिकमदून ट्रेसिंग ने फक्त आकरुती काढून ती रंगवण्यास मी सुर्वात कर्णार इतक्यातच मी पुना अबब म्हटले. कारण की वटवाघूळ विशयी मला पुना शंका आली की तो उडणारा प्राणी तर नवे ? कारण तोही घरटे बांदत नसून त्यास चोचही नस्ते. प्राण्याविश्यी आवडता पकशी असे चुकीचे लिहिले तर चिरके सर माला वटवाघूळासारखे उलटे टांगतील ह्याविशयी मला काडीमात्र शन्का नवती. एकाद्या पकश्याला वेवस्थित पकश्यासारखे दिसाव्यास काय होते हे वाटून रागाने माज्या डोक्याची लाही लाही जाली. तरिही ब्याटम्यानचा धावा करुन मनाशी हिय्या असे म्हणून मी वटवाघूळाची माहीती आठवून आठवून निबंद लिहाव्यास लागलो.

वटवाघूळ हा माजा आत्यंत आवडता पकशी आसून तो निशाचर पकशी ह्या वर गात मोडतो. रातरी जे भकश्य चरत फिरतात त्यास निशाचर म्हणतात. रातरीला हाय क्लास मराठीमदे निशा व सकाळला उशा म्हणतात. उंदराचे चित्र काडून मग त्याची शेपूट खोडून जर त्यास पंख काढले तर वटवाघूळाचे चित्र तयार होते. अशा प्रकारे उतक्रांतीमदे सरवानगीण विकास जालेला हा पकशी असून प्राणी व पकशी ह्या दोगांचे गूण त्यात एक वटलेले असतात. असा विकास पावलेला फक्त ड्रयागन हाच उभय चर आहे.

वटवाघूळ हा पकश्याला त्यांच्यात नाइट डूटी आसल्याने तो कायम सन्द्याकाळनंतर कामास बाहेर पडतो. त्याचे मुख्य काम आकाशात विरहत राणे असून मदे मदे भकश्याचा शोध घेणेही आस्ते. हा पकशी रानटी आसून कदि कदी शअरातही निदरशनास येतो. त्याचे डोळे आनधळे आसल्याने त्यास दिवसा दिसत नाही. रातरीच्या अंदारात कुणालाच काही दिसत नसल्याने बाकी सरव पकशी आनधळे होतात. पण आनधळे डोळे आसले तरी आतिनिल किरणांचा मारा करुन ते किरण परत आल्यावर्ती वटवाघूळ आजुबाजुच्या वस्तू रातरी कानाने आयकून मग बघु शकतात. एका अरवाचीन कथे नुसार वटवाघूळाचे लहानपणीचे पाळण्या तील नाव फक्त वाघूळ आसे होते पण अशा प्रकारे इतर पकशी आनधळे जाले तरी रातरी दिसत आसल्याने वटवाघूळाचीच वट रातरी वाढते त्यामुळे त्यास रातरी वटवाघूळ हे नाव कवतुकाने दिले गेले. दिवसा ते विरह करत नसल्याने अरवाचीन काळी दिवसा त्यास काईच म्हणत नवते.

वटवाघूळास आमेरिकेत ब्याटम्यान म्हणतात व त्यावर आत्यंत खर्च करून भारी पिक्चर ही काडतात जे की अखिल ब्रमांडात सरव जण पाहतात. आशा प्रकारे वटवाघूळ हा की फकत माजाच नवे तर आनतरराशट्रीय आवडता पकशी आहे. नुकताच असा ब्याटम्यानचा पिकचर मी न्यू लोटस सिनेमा स्टेशन रोड एर कंडीशन मदे घरच्यानबरोबर पायला. थेटरमधे एवडा अनधार आस्तानाही मला पिकचर नीट दिसत होता त्यामुळे वटवाघूळाप्रमाणेच मालाही आतिनिल किरण आयकायची सोय आस्णार असे मला वाटले.

वटवाघूळ सहसा उडत नाही व सहसा उडत नसेल तेवा ते कडे कपारी तसेच फानद्या तसेच झावळ्या अशा गोशटींवर उलटे लटक लेले आस्ते. जेवण जाल्यावरती ते सहसा उडून भिंगार्डे आजोबांसार्खे शतपाव्ली करुन येतात कारण की नायतर उलटे लटकल्यावरती आन्न घशाशी आले आस्ते. माणसाने शिरिशासनाची आयडीया वटवाघूळापासून प्रेअरित होवूनच घेतली आहे. फक्त आपण मदे मदे शिरिशासन करतो तसे वटवाघूळ मदे मदे पायावरती उभे राते का हे मी विदन्यानाच्या वाटसरे बाईंना विचारणार आहे.

वटवाघूळाच्या पंखानचा आकार अरध्या छतरीप्रमाणे आसल्याने त्यास पावसाळ्यातही आकाशात विरह करता येतो. संद्याकाळ जाली रे जाली की माज्या ह्या आत्यंत आवडत्या पकश्याची मी मयदानावरती जाऊन डोळ्यात तेल घालुन वाट बघत आस्तो. तर मितरांनो व मयत रिणींनो, अशा ह्या अलवकीक गुण असलेल्या पकशाला आवडता म्हणण्याशिवाय आपल्याला इतर काही तर्णो पाय आहे का सांगा ? माजे सवंगगडी हा निबंद वाचून आननदाने सदगतीत पावतील ह्यात काडीमात्र शंका नाही.


- आयशॉट उरफ राफा - सहावी ड



 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा


38 comments:

Anonymous said...

टोपी खाली मित्रा ...
भन्नाट एकदम ...

अपर्णा said...

Ishot is back meaning RAFA is byaaaaaaaaaaaaaack....:D :D

हे ल्ह्यायला आतिचशय उशीर जाला कारण मी एक मिंट लोळागोळा होऊन खुरचितून पडलेच ... :)

Amit said...

ह्या.. ह्या.. ह्या.. कै च्या कै गा भौ... :)

Prasad said...

पुलंच्या भाषेत "तुमच्या लेखनातून सरस्वती केस मोकळे सोडून थया थया नर्तन करते"
लय भारी!
Keep Writing.You made my morning.

Nils Photography said...

Mind blowing !!!

राफा said...

davbindu, अपर्णा, Amit, Prasad, Think-with-NIL : तुमच्या भन्नाट व भरभरून दिलेल्या प्रतिसादांबद्दल हार्दिक आभार ! (आयशॉट लिहील्यावर दोनेक दिवस असे 'अशुद्ध' लिहायला फार प्रयत्न करावे लागतात.. खरं म्हणजे माला हारदिक आबार म्हणायचे होते :)).
मलाही एव्हढ्या दिवसांनी आयशॉटला भेटून फार आनंद झाला !

Avani Vaidya said...

1 no re..
lai bhaaree!!!!!!!!

waat baghayala lagalyawar asa kahi tari jabarat wachayala milnar asel tar majjach majja
:) :)

Nils Photography said...

Like your sense of humor...
I have read all your blogs in one shot...
:)

(because System admin is going to block your blog from tomorrow by reading my logs in firewall :(

)

राफा said...

@Avani : Thanx a lot !!! hya veli jara jastach vaat lagali naa, err i mean, baghayala.. aayashOT chi vahich sapadat navhati na :)

@Think-with-NIL : You can request your sys admin to visit the links (i.e. if he understands Marathi) and may be, there will be a 'paradigm shift' :)

Nils Photography said...

he he...
Lyk it again !!!

हेरंब said...

आयशॉट... राफा... माझी कमेंट कुठे गेली?

माझ्या तर पायाखालचि जमिनच सळो कि पळो व्होवून गेली आहे आनी मी भयनकर बुच कळ्यातच पडलो आहे !!

- आननदाने सदगतीत पावलेला तुजा सवंगगडी

Sagar Kokne said...

आयशॉट कायम असाच राहू दे...
मला शंका आहे की स्टीव जॉब दादा कोंडकेंना आधी भेटला होता की त्याने आयशॉटची वही आधी वाचली होती ?

राफा said...

@हेरंब: आयशॉट ! पोस्टच नसेल झाली कॉमेंट (किंवा word verfication चा काही गोंधळ?). मी comment moderation करत नाही त्यामुळे थेट पोस्ट होते आणि 'spam' मधेही पाहिले आत्ताच काही कारणाने तिथे ढकलली असेल blogger spam detection ने तर, पण तसेही काही नाही.. खूप मोठी होती का रे ? मला माहित्ये पुन्हा कॉमेंट देणे फार कंटाळवाणे असते.. पण असो. तुझ्या भावना पोचल्या (आननदाने सदगतीत). मन:पूर्वक आभार !

@सागर :). आयशॉट कायम असाच राहू दे>>> तुझ्याही भावना पोचल्या... मन:पूर्वक आभार !

DhundiRaj said...

"रातरीला हाय क्लास मराठीमदे निशा व सकाळला उशा म्हणतात."
सु- परब......

Anonymous said...

अरे भन्नाट मस्त आहे हे आयशॉट प्रकरण.... मी नेहेमी उशिराच कशी पोहोचते देव जाणे... पण आता सगळा ब्लॉग वाचून काढते पटकन तुझा :)

कसलं ’अशुद्ध मस्त’ लिहीलं आहेस :)

राफा said...

DhundiRaj, sahajach : तुम्चे आतयंत आबार ! :)

Unique Poet ! said...

आयशॉट हे अससल जातीवंत प्रर्कन वाचून माजेही रुदय अगदि लगबगून आले.... :)

एक नंबर...! खूपच आवडले... सहीच !

Nils Photography said...

"जन्नी ही शोधाची गरज आहे !!! "
Super lyk it...
You should take copyright for this !!!
:)

राफा said...

@Unique Poet : तुम्चे ही आतयंत आबार ! :)

@Think-with-NIL : :). merci.

Anonymous said...

तुमी कूफच छान ल्हिलंय...
:P

राफा said...

@Me, तुम्चे ही आतयंत आबार ! :)

('Me' ने कॉमेंट दिली असे नोटीफिकेशन आले तेव्हा 'मी' च कशी काय कॉमेंट दिली असा अडीच सेकंद संभ्रम झाला :) )

Anonymous said...

Kadakkkkkkk! aayshotvar ekhad pustak nighayla kahich harkat nasavi!!! :)

राफा said...

@Anonymous, kadakkkk comment बद्दल मन:पूर्वक आभार ! :)
विविध विषयांवर पुस्तके लिहायचे डोक्यात आहेच.. बघूयात, कसे आणि काय काय होते ते!

प्रसाद said...

हाहाहा ....
आयशॉट दगड ( I mean आयशॉट Rocks )
हे काहीही आहे... ४-५ वेळा तरी वाचलंय मी ....
अन्न घशात येते, वट असलेले वाघुळ ....
हाय राम ...
असले काही डोक्यात कसे येते
आणि सवंग गडी म्हणजे तर कहर आहे ....
हसून आडवा व्हायचा बाकी होतो
Keep Rockingggggg RAFA

राफा said...

पश्या ! Rockinnnnnng comment बद्दल आत्यंतच आबार ! :)

भानस said...

फुल टू लोटपोट आहे रे राफा तुझे हे पकशी पकरन... निस्ती हसून हसून पुरती वाट लागली बघ !! :D:D:D:D

राफा said...

वेरीच मच धन्यू भानस :)

shriprasad kulkarni said...

RAPHA tu khatos kay re baba.......yevadha suchata kasa kay tula?

राफा said...

shriprasad,

aayshot adhun madhun bolaNi khato :)

Dhans !

Poonam said...

Take a bow my friend, it is really out of the world! :)

तुमच्या आयशॉट च्या सगळ्या पोस्ट वाचल्या, त्यापैकी ही सगळ्यात जास्त आवडली

Wisiting your blog for the first time and I will make sure I don't miss any post hereafter :)

राफा said...

Thanx a lot Poonam.

Please do visit the 'archives' section too.

cheers !

Tejali said...

crazyyyy :D

राफा said...

Thanx a ton Tejali ! (and apologies for a laaaaaaate reply :) )

Anujna said...

आतिचशय आवडलय!

राफा said...

Hi Anujna,

आतिचशय धन्यवाद :) !

सायली said...

नमस कार आय शाॅट !! मि तुम्चि अतिचशय मोटी फॅन झालि आए. तुमी अशेच आम्च्या बेटिला वारव वार येत रावा हिच विनन ती :)

M@yD said...

kharokhar Baglaynchi Mal phulae ajunahi ambarat ka ahet hae mala ajj kalalae....
ani ka konas mahit pun mala hi Bagla
atichshya awdu lagla ahe....
bahutake to paper var draw kelyvarhi disat nahi mhanun asel kdachit....

Anup Bawane said...

1dam zaKKkkas bar ka !