यूट्यूब वर पहा : http://youtu.be/x527bYOPfP0
स्थळ: पिट्सबर्ग, अमेरिका
काळ: साल २००३ मधील कडकडीत हिवाळा.
झालं ते असं :
मी ‘पिट्सबर्ग फिल्म मेकर्स’ मधे फिल्म मेकींग कोर्स करत होतो. एक शॉर्ट फिल्म प्रॉजेक्ट करायला फारच थोडा वेळ राहीला होता. शूट करायला एक विकएंड आणि एडीट करायला पुढचा एक विकएंड. (ते एडिटींगही जुन्या पद्धतीने करायचे होते. म्हणजे फिल्मचे तुकडे कापून, चिकटवून दृश्यांची जुळणी व फेरजुळणी करणे वगैरे. ते क्लिष्ट, किचकट व कष्टाचे काम करायला इतकी धमाल (!) आली म्हणून सांगू :) .
बाहेर अमानुष बर्फ. नटमंडळी कुणी नाहीत. अशा वेळी ह्या शॉर्ट फिल्म साठी ही कल्पना सुचली. शूट झाले. डेव्हलप केले. एडीट केले (धमाल !)
गेली ८ वर्षे तो ‘रफ कट’ पडूनच होता.. डिजिटल स्वरुपात धर्मांतर झाल्यावर फिल्म चे स्वरुप अजूनच ‘दाणेदार’ झाले होते.. ‘अशी जुनाट फिल्म पहायला कोणाला आवडेल’ ही भिती होती त्यामुळे तो रफ कट त्या प्रश्नासकट तसाच पडून होता आणि दिवसेंदिवस त्या प्रश्नाचे उत्तर ‘कुणालाच नाही’ असेच बळकट होत होते. (आता तर मोबाईल वर पण HD व्हिडीओ घेता येतात म्हणजे प्रश्नच संपला !)
शेवटी धीर करून ह्या आठवड्यात तो रफ कट मी पुन्हा एडीट केला (ह्या वेळेस डिजिटल एडीटींग!). मूळचे ‘स्टॉप मोशन ऍनिमेशन’ तसेच ठेवले व इतर कुठलेही स्पेशल इफेक्ट्स टाकले नाहीत. त्या ‘जुनाट’ स्वरुपाची वेगळीच गंमत वाटली, नॉस्टाल्जिक व्हायला झाले आणि एकंदर खूपच आनंददायक अनुभव होता तो.
तसाच आनंद तुम्हाला फिल्म बघताना वाटेल अशी आशा आहे
- राफा
ता. क. कृपया ध्वनीसकट पहा.
4 comments:
Jabari Bhava!
Simply great !!!
Liked that Breaking News scene !
दीपक, Thanx a lot !!!
शामू एनकॉउन्टर एकदम डेडली होते. :D:D
मस्तच !
भानस : शामू >>> now YOU made me nostalgic :)). पुन्हा एकदा धन्यू !
btw, मित्रमैत्रिणींनो, काही युट्यूब विशेष वापरत नसलेल्यांना एक सूचना. अश्या ब-याच जणांनी विडीओ लोड व्ह्यायला वेळ लागतो (त्यामुळे अजून पहायचाच राहून गेला आहे) अशी प्रतिक्रिया दिली आहे तेव्हा त्यांच्यासाठी :
१. विडोओ शक्यतॊ थेट युट्यूबवर पहा (विडॊओ खाली लिंक दिली आहे)
२. युट्यूबवर गेल्यावर सर्वात प्रथम विडॊओचे रेझोल्यूशन 240p करा (सुरुवातीला विडॊओच्या आयताच्या तळाशी मध्याच्या थोडे उजवीकडे 360p दिसेल ते बदला). म्हणजे जलद लोड होईल.
३. मग पॉझ करा. काही वेळ थांबून विडीओ 'बफर' होऊ द्या (तुमच्या कनेक्शन स्पीड प्रमाणे कमी अधिक वेळ पण एक ते काही मिनिटे लागतील). ह्याचा फायदा असा की बफर झालेला तुम्हाला विडीओ सलग बघता येईल. प्ले बटनावरच्या आडव्या पट्टीकडे लक्ष ठेवा. ब-यापैकी किंवा संपूर्ण बफर झाले की मग प्ले करा.
धन्यवाद !
Post a Comment