तसं म्हटल तर ह्या
लेखमालेला (हाही शिंचा फार औपचारिक शब्द) काही ठराविक आकार देता आला असता. काही
अभ्यासपूर्ण, मुद्देसूद लेखन करता आले असते. परंतु विस्कळीत गप्पा (एकतर्फी का
होईना) मारताना हे मुद्दे गौण ठरतात.
अभ्यास गप्पा मारताना दिसला पाहिजे.
‘दाखवायची’ गरज भासलई नाही पाहिजे. काय?
नाहीतर,
संवादाने
गोष्ट कशी पुढे जाते,
त्या त्या पात्राला कसा उठाव व ठसठशीतपणा येतो,
कमीत
कमी शब्दांचा संवादही कसा आशयगर्भ असू
शकतो,
संवादांमधे बोली भाषांचा वापर
वगैरे इत्यादींची साधक-बाधक चर्चा करता आली
असती आणि त्यात तुम्हाला बौद्धीक मसाज झाला असताही. पण मग मला मजा आली
नसती! गप्पा ठोकायला!
तर ते असो. आपण
विषयाकडे वळूयात.
आता एखाद्या
गावगुंडाने जर रस्त्यावर कोणासोबत अश्लाघ्य भाषा वापरली किंवा ‘असंसदीय’ वर्तन
केले तर आपण ते समजू शकतो. परंतु, एखाद्या विद्यार्थ्यांमधे लोकप्रिय असलेल्या,
सज्जन सात्विक प्राध्यापकाने जर भर वर्गात एखादा तरल विषय शिकवताना समजा पानाची
पिचकारी टाकली किंवा तद्दन बाजारु नवीन फिल्मी गाण्याची ओळ गुणगुणली तर ऐकणा-या/बघणा-या
विद्यार्थ्यांची जी अवस्था होईल, अशी अवस्था काही वेळा होते ती मातब्बर लोकांच्या काही
अपवादात्मक कलाविष्कारामधून.
आता हिंदी
चित्रपटातील घिसेपिटे ड्वायलॉक तर सर्वांनाच परिचीत आहे.
ह्या ब्लॉगवरच्या
खालील लेखात त्याचा परामर्श घेतला आहे. (लेख विनोदी आहेत. हसू आल्यास हसावे.)
नोकरी आणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक !
नोकरीआणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक ! - २
पण हे झाले सदाबहार
घिसेपिटे अर्थातच चाकोरीबद्ध लेखकाने लिहीलेले चौकटीतल्या संहितेतले अनेक वेळा
दळून झालेले 'ड्वायलॉक'!
पण अत्यंत लोकप्रिय
चित्रपटातील अत्यंत अतर्क्य संवाद कुठले असा विचार मी करतो तेव्हा हटकून
सुरुवातीला ‘गोलमाल’ चे उदाहरण डोळ्यासमोर येते.