कुठेसे कुणी व्याकूळ गात होते
सूर दूरचे की, माझ्याच आत होते?
झळा साहवेना, उगी राहवेना..
वणव्यात माझे प्रारब्ध न्हात होते
पुन्हा पुन्हा वहावे, वाटले नियतीला
असे वेगळे काय माझ्या आसवांत होते
तिने आर्त पाहिले, मला एकवार
हवेसे दिलासे त्या क्षणात होते
पहाटही धुंद त्या मंद सुगंधाने
उमलले राती काही दोघात होते
- राफा
6 comments:
सुरेख !!!
अप्रतिम !!!
खूपच आवडली रे ही गझल....
सुरेख !!!
अप्रतिम !!!
खूपच आवडली रे ही गझल....
डबल ठांकू पश्या :)
खूप छान लिहिलंय तुम्ही..खरंच खूप सुंदर.
Rishika, मनापासून धन्यवाद!
Khup chaan
Post a Comment