Jan 16, 2026

निवडणूक!

विजयी गुलालाने लाल आसमंत झाला
त्या नव्या उद्याचा, पहाटेच अंत झाला

सुराज्याचे स्वप्न पुन्हा तगलेच नाही
जागेपणीही शोक मग अत्यंत झाला

पुन्हा तीच भाषा, पुन्हा तो तमाशा
पुन्हा मनामनात, तीच वेडी आशा

पुन्हा लोकशाहीस नाडती गाडती ते
सुतकात शांत आम्ही, तिथे ढोल ताशा

मत्त पालखीचे त्यांच्या, पुन्हा आम्हीच भोई
सोयी त्यांच्याच त्यांनी... पाहिल्या जराश्या!

-- राफा

1 comment:

राफा said...

तशी मी सध्याची (राज्य/देश) निवडणूक follow वगैरे करत नाहीये त्यामुळे कोणीही जिंकले हरले तरी फरक पडत नाही. परंतु त्यानिमित्ताने खूप पूर्वी लिहिलेली ही कविता आठवली, ती कुठे सापडेना त्यामुळे आठवून इथे लिहिली... आणि त्यानिमित्ताने का होईना परंतु लिहायला सुरुवात करावी वाटले. (blogspot कसे काय चालू आहे हेही माहिती नाही पण comments आल्या तर कळेलच :) )