Jun 8, 2007

लिखाण-ए-गंमत

ब्लॉग चालू करताना मनामधे इस्टमन + फुजी + टेक्नीकलर विचार होते. 'रोजी' जे सहज उस्फूर्त वाटते ते सटासटा लिहून काढायचे आणि मग 'रोटी'च्या कामाला लागायचे (हा क्रम उलटाही होऊ शकतो) .. पण असा एक (सरळसोट व नेक) इरादा होता.. म्हणजे आहे !

आता इथे गंमत सुरु होते.. the fun begins !

ब्लॉगविश्वात मी 'नवीण' असल्याने पोस्टावे काय हा थोडा 'झोल' आहेच.. तर माझी एकंदर लिखाण-ए-गंमत आधी सांगतो !

एक तर होतं काय की इतक्या वेगाने इतके विचार येत जात असतात की त्या वेळी समोर वेळ आणि किबोर्ड उपलब्ध असेल तर ठीक नाहीतर अनेक विषय तसेच राहतात.. (कथांच्या आयडीयाच्या कल्पनांची एक वेगळी फाईल करून ठेवली आहे त्या 'निसटून' जाऊ नयेत काळाच्या ओघात म्हणून !)

आता जे लिहायचे तो विषय एखाद्या वाईन (किंवा गेलाबाजार लोणच्यासारखा) असेल तर पडून राहिल्यामुळे त्याला अजूनच चव येते, खुमारी येते.. पण काही काही तात्कालिक/प्रासंगिक विषयही असतात.. मनावर त्या घटनेचे, दृश्याचे किंवा कलाकृतीचे जे ठसे उमटलेले असतात, जे संस्कार/आघात झालेले असतात ते ताजे असतानाच मन:पटलाचे छायाचित्र घेणे चांगले ना.. एकदा 'टेंपो' गेला की गेला (मग ट्रकभरून आयडीया सुचल्या तरी काय उपयोग ? :) सॉरी मोह आवरला नाही !) ..

पण मग जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा the squeaky wheel gets the oil ह्या न्यायाने भलताच कुठलातरी आक्रस्ताळा विषय गर्दीतून वाट काढत पुढे येतो आणि एखादा हळूवार विषय 'पुढच्या वेळची' वाट पहात बसतो.

बरं.. वेळ आणि किबोर्ड (आणि उर्मी, स्फूर्ती, प्रेरणा हया साळकाया माळकाया) असला तरीही अजूनही लिखाणाचा वेग कमी पडतो. ('बरहा' करी दमला शुभांगी !). अजूनही minglish बर्याच जास्त वेगाने लिहीले जाते शुद्धलेखनाचा प्रश्न नसल्याने.. (नंतर वाचताना बाजार उठतो ते वेगळं) ह्यावर अर्थातच झरझर टाईपणे आणि मग शुद्धलेखन तपासून दुरुस्त्या करणे हाच उपाय आहे.. विचारांच्या वेगाने कधीच लिहीता येणार नाही पण अगदी ते stop-motion video सारखे तुटक तुटक वाटता कामा नये (त्या प्रकारात 'मज्जा' असली तरी लिखाणाच्या बाबतीत तसे नाही !)

अजून एक 'गंमत' माझ्या मते सर्वांच्याच बाबतीत होते.. एखाद वेळी अगदी भरपूर भरभरून लिहायचे असते पण मग खूप वेळ अजिबात काहीच न लिहून झाल्यामुळे सुरुवात करणे एकदम मुश्किल होते ! (त्याला काहीही म्हणा.. भावनिक तुंबा उर्फ emotional choke-up, किंवा writer's block वगैरे ... 'जो राईटतो तो राईटर' अशी व्याख्या केली तर मी त्यात बसेन काय ? :) )

पण हे म्हणजे सौजन्य सप्ताहात एखाद्या कारकूनाने सुहास्य वदनाने खिडकी उघडावी आणि समोर एकदम खूप लवकर येउन ताटकळलेला आणि बराचसा कावलेला, करवादलेला प्रचंड जमाव दिसावा तसे होते.. मग एकदम खिडकी तरी लावली जाते ! ... किंवा मग त्यातल्या त्यात जास्त nuisance value असलेल्याचे काम आधी करावे लागते !

म्हणजे लिखाणाच्या संदर्भात 'उपद्रव शक्ती' वाला विषय आधी घेतला जातो ... म्हणजे 'आता जर लिहीले नाही तर त्रास होईल' असा ! शिवाय अशा वेळी मला 'सुरुवात होण्यासाठी'; झटकन 'लोकप्रिय' होणारा, 'ताजा' विषय 'निवडण्याची' चूक होण्याची मला फार धास्ती वाटते.

lets start at the beginning.. a very good place to start... असे असले तरी एकंदर कोर्या कागदावर लिखाणाची/चित्राची सुरुवात करणे ही फार जालीम गोष्ट आहे !

आता ब्लॉगबाबतीत..

तर.. अजूनही ब्लॉगवर casually पोस्ट होत नाहीये.. बाकी बऱ्याच गोष्टी 'शिस्तीत' आणि 'लाईनीपरमाने' पार पाडायची सवय असल्याने निदान ब्लॉगला तरी 'हवे ते नि वाटेल तसेच' नको का करु द्यायला ? i think i should learn to relax... mentally i.e :) पण तसं होतं नाहीये..

कधी cleverly लिहीलं जातंय. खोटं ह्या अर्थी नव्हे.. जे आतून वाटत नाही असं खोटं मी लिहीत नाही (आणि कधीही लिहीणार नाही !!! :) ) .. म्हणजे थोडसं 'आता आकर्षक पॅकमधे' असं होतयं. वाईट अर्थी नाही. पण लोकं जर वेळ काढून वाचत आहेत (घडी घडी कि रिपोर्ट हमें .. :) ) तर 'वाचणेबलच' पोस्टावे असे वाटते.. मग उगाच जे झरकन लिहायचे, 'खरडायचे' ते राहूनच जाते. उस्फूर्त unedited लिखाणाची गंमत देता घेता येत नाहीये. वहीच्या मागच्या बाजूला झरकन काढलेल्या छोट्याश्या घर आणि झाडाच्या चित्राची गंमत वेगळी असते ना ?


(माझ्या मते हे विस्कळीत, अमुद्देसूद लिखाण हीही एक चांगली सुरुवात नाही का ? )

तुम्हाला काय वाटते एकूणात ? काय काय पोस्टावे ? 'आकर्षक पॅक मधले' का... काहीही.. ?

कळावे, (आणि कृपया कळवावे :) )

राफा

11 comments:

Yogesh said...

काहीही chalel :)

marathi blogs madhala vaicharik vagaire vachun atyant pakalo ahe. ekadam panchat vagaire kahihi vachayala lai avaDel :D

Sumedha said...

आज पहिल्यांदाच हा ब्लॉग गावला! सगळ्या नोंदी वाचून काढल्या, मस्त! ब्लॉगत,पोस्टत, रायटत, फेकत (इ. इ.) रहा! आम्ही आहोतच कॅचायला अर्र.. वाचायला :)

A woman from India said...

राफा,
तुमची लिहिण्याची शैली आवडली. इतर भाषांशी संयोग करत नविन शब्द तयार करण्याची खुबी हान जमली आहे तुम्हाला.

Meghana Bhuskute said...

अगदी खरं आहे. ही एक झकास सुरुवात आहे! कीप इट अप्‌!

Kamini Phadnis Kembhavi said...

एकदा 'टेंपो' गेला की गेला (मग ट्रकभरून आयडीया सुचल्या तरी काय उपयोग ? :) सॉरी मोह आवरला नाही !) ..>>>>आई ग अरे काय!!!!!! :))))))))))))))))))))

Kamini Phadnis Kembhavi said...

हं! होतं खरं असं लिहायचय ठरऊन लिहायला बसल तर सुचत मात्र काहिच नाही, आणि जेंव्हा सुचत तेंव्हा एकतर वेळ नसतो किंवा अजून काही कारण.........
वहीच्या मागच्या बाजूला झरकन काढलेल्या छोट्याश्या घर आणि झाडाच्या चित्राची गंमत वेगळी असते न>>>अगदि खरय हेच हेच असायला हवं.आणि आकर्षक पॅक असला तरीही तू जे लिहिणार ते नक्कीच वाचनीय असेल तुझं लिखाण नेहमीच वाचणा-याचा मूड बदलणारं असतं.

लगे रहो..... :-)
पुढच्या लेखाची वाट पहात्ये

Unknown said...

tu lihit raha re... :) maaybolivar jase 3-4 mahinyatun takayachas tase nako karu... yahun magane lay nahi... :)(comment ch takali aata ghadi ghadi report baghayala nako... :P )

Dk said...

Je lihils te sahiii aahe likhte raho :D

ॐकार केळकर said...

गुगल इंडिक टूल वापरा... खरडायला फारच सोपे आहे...
पहिली/दुसरी वेलांटी, उकार वगैरे आपल्याला बघावं लागत नाही...
शब्दाच्या शेवटी अनुस्वार वगैरे ही मुद्दाम बघावे लागतं नाहीत!

http://www.google.com/transliterate/indic/MARATHI

राफा said...

ॐकार, Thanx a lot ! वापरून बघतो.

Tejali said...

hehhehe...bas likhate raho !! keep d spark alive:) all d best