Jun 27, 2007

यादों की बारात !

राहुल देव बर्मन !!!

२७ जून !

आज 'पंचम'चा जन्मदिवस !

आज दिवसभर त्याच धुंदीत राहणार ! रोज एक 'ट्रॅक' सतत चालू असतोच.. पण आज विशेष !!!

असंख्य गाण्यांच्या अगणित आठवणी... अनुभवलेले असंख्य सुंदर क्षण ! अनेक कार्यक्रम, मुलाखती, खास 'किस्से'. महाजालात तर अतिशय जबरदस्त नि सुंदर माहिती उपलब्ध आहे..

काय करु ? randomly आवडती गाणी झरझर लिहू ? मग एखादे अत्यंत आवडते निसटले तर ? हरकत नाही... हा काही 'ज्ञान' दाखवायचा दिवस नाही...

अप्रतिम अनुभव देणारी,
मनाला उभारी देणारी,
झिंग चढवणारी,
नाचायला लावणारी,
वेगळ्याच जगात घेऊन जाणारी,
ठेका धरायला लावणारी,
आसमंतात रोमान्स पसरवणारी,
विविधरंगी
विविधढंगी
गाणी देणाऱ्या पंचमची आठवण अजूनच तीव्र होण्याचा हा दिवस ! कृतज्ञ होण्याचा दिवस !

पार्श्वसंगीताने अनेक चित्रपटांतील प्रसंगाना वेगळी उंची देणारा आर डी हा एक वेगळाच आवडीचा विषय !

काय लिहू ? किती लिहू ?

ह्म्म्म्म... आवडती गाणी लिहायला सुरुवात केली आणि...

फिझूल आहे प्रयत्न !!! :)..

तरीही ह्या आठवड्यात/ गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा (काही काही हजराव्यांदा) ऐकलेली, अजूनही काहितरी नवे सापडणारी, पुन्हा नव्याने आवडलेली नि भिडलेली random गाणी :

यादोंकी बारात - टायटल सॉंग - both male and female versions
यहा नही कहूंगी - मि. रोमिओ
राह पे रहेते है - किशोर - नमकीन
क्या यही प्यार है - रॉकी
मेहबूबा - शोले
संग मेरे निकले थे साजन - फिर वोही रात
जिया ना लागे मोरा - बुढ्ढा मिल गया
इश्क मेरा बंदगी है - ये वादा रहा
राजा बना मोरा छैला कैसा - गरम मसाला
प्यार करता जा - भूत बंगला


बास... हाही खटाटोप फिझूल वाटतोय..

एखादे गाणे हवे असल्यास मला जरुर मेल करा : rahulphatak28@gmail.com

जय पंचम ! :)

4 comments:

Meghana Bhuskute said...

I can understand and really appreciate your intensity. Just too good. RD saraky\hya manasani aapalya aayushyachya kalat kartrutw dakhawayala asaawa, yatach kiti dhanyata watate na ekhade weli? mastach. maja ali.

Sapna said...

राहुल, आर डी हा माझा पण लाडका !! त्याची गाणी प्रत्येक वेळी नवा अनुभव देऊन जातात!! प्रत्येक वेळेस नव्याने रोमांच उभे राहतात अंगावर!!

पंचमदा, इतकी सुंदर, अजरामर गाणी दिल्याबद्दल Thank you!!!!

Monsieur K said...

hi rahul,

i know your list is just an indicative one.
personally, i also like the songs from Ijaazat, Sunny, Aandhi, Jawaani Deewani... i know the attempt is futile... cant simply enlist all of them :D

another interesting anecdote on RD:
remember the song "meri bheegi-bheegi si" from anamika? apparently, the tune is a straight lift-off from a bengali song which i think RD had composed. incidentally, the bengali song is a very romantic song which the hero sings to pataao the heroine, and then RD used the same tune in hindi to express pathos!!

anyways, feels good to read your tribute to RD.

~ketan

राहुल फाटक said...

मेघना, सपना आणि केतन, प्रतिसादाबद्दल आभार..

केतन, ते पंचमचेच गाणे आहे आणि पंचमनेच म्हटले आहे (मोने पॉरे रुबी राय). ते बंगाली गाणे आहे माझ्याकडे :)