“हं.. आता हे सांग..”
“कोडं तू सोडवते आहेस का मी ?”
“हो का? नाही तेव्हा लुडबूड करतोस ना मी सोडवायला लागले की ?”
“आयला, हे शब्दकोडं म्हणजे अजब प्रकार आहे. नाही म्हणजे महिनो न महिने कुणी ढुंकूनही पाहत नाही. एकदा का रोज सोडवायचा झटका आला की मग पुढचे काही दिवस विचारता सोय नाही.”
“अवांतर बडबड नकोय. मदत करणारेस का?”
“बोला..”
“सरिता आणि सागर ह्यांच्या मीलनाची जागा.”
“क्याय ? सरिता आणि .. ?”
(आवाज वाढलेला) “सा ग र ! ह्यांच्या मीलनाची जागा.”
“अं… सोपं आहे. खाडी !”
“अं ?”
“खाडी खाडी !”
“च्च. चार अक्षरं आहेत.. ‘खाडी खाडी असं लिही दोनदा’ वगैरे पुचाट विनोद नको आहेत. सांग लवकर ! एव्हढं आलं की आसपासचं सुटेल लवकर बहुतेक..”
“हं..”
“…”
“…”
“च्च ! ‘पार्ले टिळक’ चा ना तू ? काय झालं आता ? …”
“हं.. स रि ता.. आणि... सागर. ह्यांच्या…?”
“मीलनाची जागा ! चा र अक्षरी ! ”
“हां.. बेडरुम !!! ”
सप्रेम नमस्कार.
आपले सहर्ष स्वागत!
'राफा' म्हणजे ‘राहुल फाटक’ चे संक्षिप्त रुप.
'काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम’ हे वचन मी विद्वानांंमधे मोडत नसल्याने मला लागू होत नाही. परंतु अनेकविध कलांमधे अत्यंत रुची व किंचीतशी गती असल्याने ह्या ब्लॉगवर मी ह्या गोष्टींमधे वेळ व्यतीत केलेला तुम्हाला आढळेल: विनोदी लेख/चुटके, ललित लेख, लघुकथा, नाटक, काव्य, चित्रकला व प्रकाशचित्रे.
ह्या ब्लॉगवरील सर्व कलाकृती पूर्णपणे 'ओरिजनल' आहेत.
- राफा
ता.क. फोनऐवजी संगणकावर सर्व लिंक्स नीट दिसतील विषयानुसार.
विषय
आयशॉट
(5)
उपयुक्त
(3)
कथा
(5)
काव्य
(17)
चित्रकला
(10)
झटक्यात..
(16)
पुणे - रस्ते आणि खड्डॆ
(3)
लगोरी
(19)
विनोदी
(33)
संगीत / चित्रपट
(10)
Mar 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
15 comments:
saheech!
लै भारी !!!
भांडणात एकमेकांची शाळा काढणे हा सगळीकडे चालणारा प्रकार आहे. हे माहीत नव्हत मला.
kharach Bharee..
Aawadale nehami pramane :)
ha ha ha...ekdam dhasu...:)
chala famous shalet nasnyacha ajun ek faida....bhandanat shala kadhata yet nahi....
@Yogesh, @Jayanti : Thanx :)
@अनिकेत: 'एकमेकांची शाळा काढणे' >> LOL
@अपर्णा : ढासू कॉमेंट्स बद्दल ठांकू ! :)
RAFA me RAWA rahul walhekar... tuze blog nehmi wachato... TU DILELA PAKIT AJUN JAPUN THEWALAY.. ani lekhna baddal kay bolu.. bhari ahes tu...
RAWA ! wa wa !
many thanks ! (भारी म्हणालास म्हणून आभारी आहे ;) )
पुढचा झकास परफॉरमन्स केव्हा ? (रोजचा 'मिर्ची इट्स हॉट' वरचा सोडून :))
dokebaaj!!!!!!!
Shreyas :)
मस्त रे
Thanx Anonymous.. paN tumache naav kaay :)
:D :D sahiiye
Thanx Deep :)
1ka aadthavadya madhe mi tuze sagale Lekh vachale........... Baryachada Hasun pot dukhat hota.
Ishot mala sagalyat jast aavadala...Asa vatata ki ishot che 100 lekh asayala havet...........
Rapha tula challenge nahi re mitra........
Hi Shriprasad, tuzya utkat pratikriyebaddal manahpurvak dhanyawad !!!
(aayshot la punha lihayala zale ahe vatate ata :) )
Post a Comment