Feb 13, 2012

जगावे कसे ते सांग..

जगावे कसे ते सांग, येथे कण्याने ताठ
शेवटास आहे जिथे, आकाशही वाकलेले

फुका आवई नको, अंतहीन ग्रहणाची
बिंब तेजाचे होते.. जरासे झाकलेले !

एकला डाग करतो, कुणा अस्वस्थ रात्री
घोरती निवांत कोणी, नखशिखांत माखलेले

नको बोध तुमचा, जरा चवीने जगाया
अवेळी आहेत अश्रू, आम्हीही चाखलेले


- राफा

6 comments:

सौरभ said...

क्या बात है !

राफा said...

सौरभ : मन:पूर्वक आभार !

प्रसाद said...

एखादी गोष्ट मनापासून खूप खूप आवडली तरी कौतुक करायला फारसे वेगळे शब्द सापडत नाहीत बऱ्याचदा , म्हणून फक्त अप्रतिम म्हणून थांबतो इथे. सुरेश भटांच्या फार गझला वाचलेल्या नाहीत , पण त्यांची हटकून आठवण आली.
'अश्रूंचे मीठ जगण्याला चव आणते' वगैरे सुवाच्य format मध्ये सुविचार म्हणून शाळेत फळ्यावर लिहिलेले या आधी पहिले नव्हते म्हणून बरे झाले , नाही तर इतकी अप्रतिम संकल्पना अळणी होऊन गेली असती आत्तापर्यंत. इथे किती भिडून जातीये ती !

राफा said...

पश्या, तुझ्या अप्रतिम प्रतिक्रियेवर 'मन:पूर्वक आभार' एव्हढेच म्हणून थांबतो !!! :)

Unknown said...

he pharach chan aahe

राफा said...

हर्षवर्धन, मन:पूर्वक आभार !

'तळघरा'मधल्या (archives) लेखनावर प्रतिक्रिया आली की जास्त आनंद होतो :) कारण ताजे तर सर्व जणच वाचतात.