खूप खूप
वर्षांपूर्वीची गोष्ट.
‘व्हिडीओ फिल्म
मॅगझिन’ ही कल्पना तेव्हा नवीन होती. अशा पहिल्या वहिल्या मॅगझिनच्या (‘लहरें’)
एका ‘अंकात’ फिल्म इंडस्ट्रीतल्या एका सुप्रसिद्ध जोडगोळीतला सुप्रसिद्ध एक कुणी
मुलाखत देत होता...
त्या एकाच्या नेहमी
बरोबर असणारा दुसरा मात्र ह्या मुलाखतीच्या वेळेस हजर नव्हता. ह्याचे कारण आता
सर्वांनाच माहीत झाले होते. त्या दोघांची जोडी फुटली होती. एक प्रदीर्घ आणि अत्यंत
यशस्वी अशी भागीदारी संपुष्टात आली होती.
तो ‘एक’ म्हणजे सलीम
खान होता. ‘सलीम-जावेद’ मधला सलीम!
मैत्री आणि लेखनातील
भागीदारी संपुष्टात आल्याला काही काळ लोटला असला तरी कडू चव अजूनही त्याच्या
जीभेवर रेंगाळत होती. त्यामुळे शब्दही टोकाला विष लावलेल्या बाणांसारखे निघत होते.
मुलाखतकाराचा थेट प्रश्न
आला ‘आता तुम्ही वेगळे झालात.. जावेदना यश मिळत आहे तसे तुम्हाला मिळत नाहीये अशी
इंडस्ट्रीत चर्चा आहे.. काय म्हणणं आहे तुमचं?’
(खरं म्हणजे कुणी
चर्चा करो वा ना करो, वास्तव तेच होतं. गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होती.)
सलीम निर्ढावलेपणाने
व आत्मविश्वासाने उत्तर दिले:
“एक संस्कृत श्लोक
आहे…”