स्थळ : पुणे शहरातील एक रिक्षा स्टॅंन्ड. वेळ संध्याकाळी ७.३०.
पात्रे : मी आणि, कुठेही चलायला विचारलं तरी 'नाही !' म्हणून प्रश्न सीमापार धाडण्याच्या तयारीत पहिला बाणेदार रिक्षाचालक ..
पण मी 'यॉर्कर' टाकतो …
मी : तुम्ही कुठे चालला आहात?
रिक्षाचालक : ?? अं !!! (खरं म्हणजे प्रश्नकर्ता तो असायला हवा होता. झालेला गोंधळ समजून घेण्याची धडपड)
मी : नाही. म्हणजे कोथरुडला चालला आहात का?
रिक्षाचालक :अंऽऽऽऽ (ओशाळलेले स्मितहास्य ).. बसा.
दृश्य २ :
वेगळा रिक्षा स्टॅंड. वेगळ्या दिवशी.
मी : तुम्हाला कुठे जायचे आहे?
रि. चा. : (अनवधानाने उत्तर) स्वारगेट ! अंऽऽऽ.. तुमी कुटं चाल्ला ?
मी : ( ते महत्वाचे आहे का वेड्या?) कोथरुड ! असू दे. उगाच तुम्हाला तसदी नको..
(दुसऱ्या रिक्शावाल्याकडे वळतो पुन्हा अनपेक्षित प्रश्नाचा यॉर्कर टाकण्यासाठी)
दृश्य ३ : ह्याच धर्तीवर आगामी (पण सध्या काल्पनिक) संवाद :
मी : तुम्हाला कुठे जायचे आहे?
रि. चा. : अंऽऽ ! मला अं.. अर्रर्र.. तुम्हाला कुठे..?
मी : नवीन लायसंस आहे वाटतं ? मला कुठे जायचय हा सवाल फिजूल आहे. तरीपण आपल्या स्टॅंडवरच्या इतर रि. चा. न्शी गप्पा मारुन झाल्या असतील, शिवाय योगायोगाने रिक्षाही आहेच तेव्हा तुमचा चालवायचा मूड असेल, दिवसभरच्या मग्रूरीचा कोटा पूर्ण झाला असेल, मुहुर्त व रिक्षाचे तोंड असलेली दिशा ठीक असेल आणि तुम्हाला फार वेदना होणार नसतील तर कोथरुडला येणार का ?
रि. चा. : ( पश्चातापदग्ध होऊन, अश्रूपात करत मीटर टाकतो ) बसा साहेब.. अन्या ! मी यानला 'खाली' सोडून येतोरे.
(अर्ध्या वाटेत आल्यवर रडू आवरत)
रि. चा. : साहेब तुम्ही माझे डोळे उघडलेत ( म्हणजे ? हा आत्तापर्यन्त झोपेत चालवत होता की काय ?) मी आता कुठल्याबी गिराइकाला नाय म्हननार नाय !
मी : कसचं कसचं. वास्तविक मैने क्या किया हय? मैं तो अच्छे शेहेरी होने के नाते अपना फर्ज अदा कर रहा था... काश पुणे का हर रिक्शावाला तुम्हारी तरह होता तो इस देश का ..
रि. चा. : ए xxखाऊ.
मी : !!!!
रि. चा. : बगा सायेब ... (एका नाठासाला सायकल चालीवतो का इमान ?
मी : (हुश्श!)
दृश्य ४ :
कट टू : वास्तव
मी : पस्तीस ना ? हे घ्या. थॅंक्यू !!!
रि. चा. : वेलकम सर !!!
मी मूर्च्छीत पडल्याचे न पहाता निघून जातो …
दृश्य ५ :
रिक्षा जवळ येउन थांबताच ‘अतिविशिष्ट’ पेयाचा भपकन वास !
मी : (रि. चा. माझ्याचकडे पहात आहे अशी सोयिस्कर समजुत करुन घेऊन) कोथरुडला येणार का?
रि. चा. :माराष्ट्रात कुठई येउ की ! बसा !
मी : (आत बसत) बर मग आधी यवतमाळला घ्या.
दृश्य ६ :
.....
.....
मी : सावकाश हो...
रि. चा. :च्यायला ह्या खड्ड्यांच्या .. हे खड्डे बुजवणायाना अमेरिकेत नेले पाहिजेत ट्रेनिंगला
मी : का ?
रि. चा. : हेना 'समांतर' म्हणजे काय माहित नाही. खड्डा बुजवायचा म्हणजे वरती उंचवटा करुन ठेवतात...
मी : बरोबर आहे. (तो बिचारा कारुण्याला विनोदाची झालर लावत होता.. पण रिक्षा त्याची आपटत होती !)
....
.....
(अमेरिकेतले आणि भारतातले खड्डे आणि उंचवटे ह्यावर एक परिसंवाद झाल्यावर)
रि. चा. : तुमी किति वर्ष होता तिकडं?
मी : पाच.
रि. चा. : तुमचं शिक्शाण तिथच झालय का ?
(नेमका मोठा खड्डा येउन रिक्षा पुन्हा आपटते.. त्यामुळे 'तिथच' हा शब्द मला ऐकूचं येत नाही.. त्यामुळे त्याचा प्रश्न 'तुमच शिक्शाण झालय का' असा वाटतो. मी त्याचा प्रश्न 'किंवा' ह्या सदरात टाकून पुढच्या प्रश्नाची आणी खड्ड्याची वाट पाहू लागतो !)
***
18 comments:
ha, ha - ultimate.
त्याचा प्रश्न 'किंवा' ह्या सदरात टाकून पुढच्या प्रश्नाची आणी खड्ड्याची वाट पाहू लागतो
- pu lanchya 'tumhi swata:laa koN samajataa?' chi aaThavaN zaalee.
जबरदस्त लिहीता राव!
तुम्ही मायबोलीवरचे 'डायवर कोन हाय' वालेच ना?धमाल लिहीता या विषयांवर. आणखी लिखाणाच्या प्रतिक्षेत.
अनु
hehehe raaphaa jabareech ki vo
yeu dyaa anik
धन्यवाद नंदन, अनु आणि श्यामली.
अनु, होय. मी तोच. :)
ha ha lo po
sahi rapha...
tumacha blog vachoon anand jhaala :)
hey Rahul! chhan vatal tula ithe pahun. welcome!!
and eagerly waiting for the new updates.
Apratim..sahi!! Punyatle rikshawale ha ek vegala sanshodhanacha vishay aahe!!!
Thanx अर्चना, योगेश, ट्यू, स्नेहा :). योगेश तू 'योग' का ?
nahi. me yogy.
ह ह पु वा
एकदम मस्तच!!!!
[khas puneri.....] lai bhari lihitos rav!!!! pan sadhya tv war apala nav baghayacha yog nahi ka???
धन्यवाद मंदार :).
बघूयात ! (let's see चा स्वैर अनुवाद :) )
"रि. चा. :माराष्ट्रात कुठई येउ की ! बसा !
मी : (आत बसत) बर मग आधी यवतमाळला घ्या."
राहुल हे जबरा.
हसून हसून पुरेवाट झाली.खूप छान लिहितोस तू.
aaj mala bahuda office madhe 2-4 Memo nakki milnar Rahul. Aaj sakal pasun tujhe lekh vachat ahe mi. hasun hasun purewat jhali majhi. ho pan Urmat riksha walyanshi kasa bolaycha he uttam lihila ahes....
Sunil , Shilpa : Thanx :)
मस्तच !!
दृश्य ५ जबरदस्त :) मला एकदा ट्राय करायला आवडेल :P
yawatmal rocks!!!!!!!1
Post a Comment