May 24, 2007

निबंद - पावूस !

पावूस !
- आयशॉट उरफ राफा (सहावी 'ड')
पावूस हा माजा आतिचशय आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भात व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेवू शकतो. पाउसाळ्यात मुख्यतवे गळीत हंगाम असतो. पाउसाळ्यात जास्त करून पावूस पडतो, हिवाळ्यात थन्डी पडते व उन्हाळ्यात ऊन पडते. त्यामुळे वरशभर कुठला ना कुठला रुतु पडिक असतो. 'रिमजिम पडती श्रावण गारा' हे गाणे आतिशय रोमहर्शक आहे. आमचा रेडियो गेल्या वरशी भिजल्याने बिघडला आहे त्यामुळे गाणे नीट ऐकू नाही आले तरीही आतिचशय आवडले.
पाउसाची सुरुवात रोमहर्शक असते. आधी कडाक्याचा उन्हाळा पडतो. पेपरमधल्या वृत्तपत्रात बातम्या येउ लागतात. 'उन्हाळा कमी होता की काय म्हणून आता पावसाने मारलेली आहे' अशी बातमी तर नेमीच असते (‘दडी’ हे लिहायचे राहिले ते कंसात लिहिले आहे ). सबंध आसमंत वातानुकुलित झालेला असल्याने खूप धूळफेक होत असते. (‘वात’ म्हणजे वारा हे कालच कोरडे सरानी शिकवले. कधी कधी ते ‘पोरांनी वात आणलाय ह्या’ असे म्हणतात त्याचा अर्थ मात्र कळत नाही.) अशा हवामानात सर्व पक्षी कोकीलकूजन करायचे थांबवून झाडांमधे गुपत होतात. काळे ढग जमल्यामुळे आकाशात थेटरमधे उशिरा गेल्यावर असतो तसा काळाकुट्ट अंधार होतो व मधेच डोअर किपरने लखकन बॅटरी मारावी तशी वीज चमकून जाते. सगळीकडे शेतकरी आभाळाला डोळे लावून बघत असतात आणि शेतकरण्या त्यांच्याकडे बघत असतात. अशा मंगल वातावरणात वरूण राजाचे आग मन होते.
भारतात पाउस अंदमान येथे बनतो. तो वळत वळत केरळ गावात आणि तिथून वळत वळत पुणे शहरात येतो. म्हणूनच त्याला वळीव म्हणतात किंवा काहीजण वळवाचा पाउस ही म्हणतात. (आम्ही समोरच्या गोगटे काकाना त्यांच्यासमोर 'काका' आणि इतर काळी 'तात्या विनचू' म्हणतो तसेच हेही दोन सन्मानार्थी शबद आहेत)
काल पुण्याच्या शहराच्या आत पाउस पडला. पुणे हे प्राचीन व प्रेकशणीय शहर आहे. तिथे शिन्दे छत्री, शनिवारवाडा, सिटी प्राईड, पर्वती, काकडे मॉल अशी पर्यटन स्थळे आहेत. ह्यातल्या काही ठिकाणी घरचे लोक मला रविवारी पर्यटनाला नेतात.
काल पाउसाबरोबर गाराही पडल्या. गोगटे काकानी बराचश्या जमवून त्यांच्या घरच्या माठात टाकल्या. ते कुठलीही फुकट गोशट वाया घालवत नाईत.
अंत्या आतिशय बावळट आहे. तो बाबांचे हेलमेट घालून गारा वेचायला आला होता. मग मीही छतरी घेऊन गेलो. पण छतरी उलटी करुन गारा वेचल्याने ती फाटली. समोरच्या मंगूने नवीन शरटं घातला होतान तर तसाच भिजायला आला आणि चिखलात घसरून पडला. (तो घरी गेल्यावर त्याच्या कानफाट नावाच्या अवयवावर त्याच्या बाबानी निरघुण प्रहार केले ते त्याना अजिचबात शोभत नाही.) एका दिवसात मंगूला एव्हढे मोठे गालगुंड कसे झाले हा प्रश्न वर्गात दुस़ऱ्या दिवशी सर्वाना पडला.
असा हा रोमहर्शक रुतु मला आतिचशय आवडतो !
***


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

21 comments:

अनु said...

Jabara!!!

Yogesh said...

sahi.

Anonymous said...

"niband" ani"aaj" donhi superb....khupach maja ali vachtana

amity said...

nice one..
lol

Yogesh said...

http://shabdaveena.blogspot.com/2007/06/blog-post_08.html

राफा said...

योगेश,
त्या लिंकवर तुझी कॉमेंट वाचली. मला त्या लेखनाचे योग्य श्रेय मिळावे म्हणून केलेल्या प्रयत्नाबद्दल अत्यंत आभार !

साहित्य चौर्याचा प्रकार निश्चितपणे वाटत नाहीये. कारण
१. सकाळच्या अधिकृत अनुदिनी गटांपैकी एक वाटतोय. (मी आधी पाहिलेला नाही कधी).
२. बाकीच्या पोस्टमधे लेखकांच्या नावासकट साहित्य पोस्टले आहे.

मीच आयशॉट (व राफा) ह्या टोपण नावाने लिहिल्याने श्रेय (म्हणजे थेट माझ्याच पाठीवर थाप) मिळण्याचा जरा प्रॉब्लेमच आहे :)

तुझ्या आस्थेबद्दल व तळमळीबद्दल (concern) खरंच ठांकू ठांकू !

Kaumudi said...

sundar.... itka mast nibmbandha lihila asta tar kiti mark milale aste?

Anonymous said...

sahi..tumhi lihilaay ka haa nibandh? mage mala haa mail aala hota...asach forward...jaam maja aali hoti vachayla. :)

pan tyaat naav navta! sahi lihilay...bakich vachto aata! :)

- Tiu (Swapnil)

राफा said...

अभिप्रायांबद्दल सर्वांचे आभार !
स्वप्निल, त्या टोपण नावातला ("आयशॉट उरफ राफा") मधला 'राफा' म्हणजेच राहुलफाटक :)

Digpal Lanjekar said...

ek number!

Anonymous said...

हे राहुल माझ्या ब्लॉग वर तुझा हां निबंध मी राफा च्या नावाने ठेवला होता, मला नुकतीच तुझ्या ब्लॉग ची लिंक मिळाली... खुपच छान लिहितोस तू.

shilpa said...

sahich, aaj mi office madhe kaam sodun (Je mi adhun madhun karte ho) nusti hasat ahe....am waiting for ur next Nibanda......

राफा said...

Nile, Shilpa : Thanx :)

pradeep said...

i really lykd wt i read. simply awesome, nw i mst said keep going.

राफा said...

Thanx a lot Pradeep.

अपर्णा said...

आयशॉट नवीन निबंद कदी लिवणार?

mau said...

अतिचशय मस्त...
:P :P :P

राफा said...

अपर्णा, 'लवकरच' असे उत्तर ठोकून देत नाहीये.. पण खरचं 'लवकरच' ! (अशी आशा आहे :) )

mau, अतिचशय आभार ! :)

Anonymous said...

"..पण छतरी उलटी करुन गारा वेचल्याने ती फाटली".. lagech dolyasamor chitra ubha rahila... office madhe basun wachtey pan nko wachayla aata... faar hasayla yeta

Anup Bawane said...

खूपच छान !झक्कास !

Anup Bawane said...
This comment has been removed by the author.